नवी दिल्ली, (हिं.स.) - तृणमूल कॉंग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, भाजपा-रालोआ आणि इतरही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल आपण त्यांचे आभारी आहोत. परंतु आपली सद्सद्विवेकबुद्धी ही निवडणूक लढविण्यापासून आपल्याला परावृत्त करीत आहे. तेव्हा आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत नाही, असे स्पष्टीकऱण माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी दिले आहे. डॉ. कलाम यांच्या नकारामुळे संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार विद्यमान केंद्रीय वित्तमंत्री प्रणव मुखर्जी यांची दावेदारी आणखी प्रबळ झाली आहे.
पुढील महिन्यात होणार्या नव्या राष्ट्रपतीच्या निवडीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी गेले काही दिवस जोरदार तयारी चालविली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.ए.संगमा यांनी सर्वप्रथम या पदासाठी निवडणूक लढविण्याकरिता आपली उमेदवारी जाहीर केली. संगमा यांना ओडिशातील सत्ताधारी बीजू जनता दल, तामिळनाडूतील सत्ताधारी अण्णा द्रमुक पक्षाने पाठिंबा जाहीर केला. तसेच त्यांना इतर पक्षांनीही पाठिंबा द्यावा, यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली.
त्यानंतर बराच खल करून अखेरीस कॉंँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देण्याची घोषणा केली. दरम्यान प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल कॉंग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी मुखर्जी यांना आपला विरोध असल्याचे सांगत माजी राष्ट्रपती आणि ..भारताचे मिसाईल मॅन.. अशी ओळख असलेल्या डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना आपला पाठिंबा जाहीर केला. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील अन्य काही पक्षांनाही हा पर्याय पुर्वीपासूनच पसंत असल्याने डॉ.कलाम यांची मनधरणी करण्याच्या प्रयत्न गेले काही दिवस सुरू होता.
तथापि सोमवारी भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांच्याशी चर्चा करून कलाम यांनी त्यांना आपण राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत सहभागी होऊ इच्छित नसल्याचे सांगितले. तसेच यासंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट कऱणारे प्रसिद्धीपत्रकही त्यांनी जारी केले.
पी.ए.संगमा यांनी मात्र आपल्या निवडणूक लढविण्याच्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यांचे मित्र आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संगमा यांना जाहीरपणे विरोध केला आहे. संगमा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, याकरिता पवारांनी खास आपल्या शैलीने इतर पक्षांमार्फत संगमांवर दबाव वाढविण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी या घडामोडींनंतर काय पावले उचलणार याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
अडवाणींची डॉ. कलाम यांच्यासोबत दूरध्वनीवर चर्चा
नवी दिल्ली- भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी आज(सोमवार)माजी राष्ट्रपती डॉ. कलाम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी तृणमूल कॉंग्रेस पक्षाने एपीजे अब्दुल कलाम यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. कलाम यांना राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पाठिंबा असल्याचे समजते. परंतु, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील उमेदवारीसंदर्भात अद्याप निर्णय घेतलेला नाही, असे कलाम यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे त्यांची समजूत घालण्यासाठी आज सकाळी लालकृष्ण अडवानी यांनी कलाम यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केल्याचे वृत्त आहे. दरम्यान, भाजपचे ज्येष्ठ नेते सुधिंद्र कुलकर्णी यांनी आज दोन वेळा कलाम यांची भेट घेतली. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

No comments:
Post a Comment