नवी मुंबई : वाशी टोल नाक्यावर मनसेचे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. मनसेचे आमदार बाळा नांदगांवकर यांच्यासमोर मनसेचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले आहेत.
टोल नाक्यावर वाहनांची नोंदणी करण्यासाठी कुणी बसायचं, यावरून वाद झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. टोल नाक्यांवर प्रमाणापेक्षा अधिक वसुली वाहन चालकांकडून होत असल्याच्या संशयावरून, मनसेने राज्यातील टोल नाक्यांवर मनसेचा पहारा आहे. मनसे पुढील पंधरा दिवस हा पहारा ठेवणार आहे. मनसेकडून वाहनं मोजली जाणार आहेत. येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांच्या नोंदी मनसेकडून ठेवली जात आहे. पंधरा दिवसांच्या वाहनांची सरासरी काढल्यानंतर टोलमध्ये नेमका काय झोल आहे, हे समोर येणार आहे. म्हणून मनसेकडून वाहनांची नोंदणी करण्यात येत आहे.
टोल नाक्यावरील वाहनांच्या नोंदीचा आजचा पहिला दिवस आहे. पहिल्याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे.

No comments:
Post a Comment