रत्नागिरी: मान्सून सक्रिय होताच पहिला फटका कोकण रेल्वेच्या प्रवाशांना बसलाय. आडवलीजवळ रुळावर आलेले दगड आणि मातीचे ढिगारे आता बाजूला करण्यात आलेत. खोळंबलेल्या सहा गाड्या वेगवेगळ्या स्थानकांतून पुढे सरकू लागल्या आहेत. मुसळधार पावसामुळे वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे.
गेल्या ३६ तासांपासून कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा आणि आडवली स्टेशना दरम्यान मातीचे ढिग रुळावर वाहून आले त्यामुळे गेल्या पाच तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प होती. 
No comments:
Post a Comment