Monday, June 25, 2012

रायगडमध्ये भरला होड्यांचा मेळा

रायगड: पावसाळ्याला सुरुवात होताच रायगडच्या किनाऱ्यांवर होड्यांचा मेळावा भरलेला दिसत आहे. रायगडमधील मच्छिमारही मासेमारीसाठी आता नारळी पौर्णिमेकड़े डोळे लावून बसले आहेत.
किनारपट्टीवर मोठ्या ऐटीत उभ्या असलेल्या हजारो होड्यांना खळखळणारा समुद्र जणू आव्हानच देत आहे.
पावसाळ्यात मच्छिमाऱ्यांना मासेमारी करण्यास बंदी असते. दरम्यान याच कालावधीत अनेक मासे प्रजनन करतात. त्यामुळे हा कालावधी माशांना पोषक असतो. म्हणूनच पुढची दोन महिने तरी होड्या किनाऱ्यावर नांगरलेल्या दिसतील.
काही मच्छीमार आपल्या होड्यांची डागडुजी करताना तर काहीजण आपआपल्या होड्यांमध्ये सुस्तावलेले दिसतायेत.
यामुळे ह्या किनाऱ्यांवर विलोभनीय असे चित्र तयार होत असून यामुळे या किनाऱ्यांवर होड्यांचा मेळावा भरला असल्याचा आभास होतोय.

No comments:

Post a Comment