नातेपुते, (वार्ताहर) - ॥ माझे माहेर पंढरी | आहे भीवरेच्या तिरी ॥
माझी बहिण चंद्रभागा, करी तसे पाप भंगा ॥
जन्मासी येऊन पहा रे पंढरी |
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी ॥
चंद्रभागेच्या तिरी कर कटेवरी ठेवुनी भक्तांची वाट पाहत उभा असलेल्या विश्वव्यापी श्री विठ्ठलाच्या भेटीची आस लागलेल्या व शाश्वत सुखाचा आनंद घेत मुखी हरिनामाचा गजर करीत निघालेल्या लाखो वैष्णवांच्या भेटीसाठी व पांडुरंगाच्या भेटीसाठी वर्षभर वाट पाहणार्या वैष्णवांची मांदियाळी ऊन, वारा, पाऊस सहन करीत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे स्वागत सोलापूर जिल्ह्याच्या हद्दीत धर्मपुरी येथे रविवारी सकाळी ११.१० वा. तोफांची सलामी देऊन करण्यात आले.
दरम्यान, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री लक्ष्मणराव ढोबळे, जिल्हाधिकारी गोकुळ मवारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशिगंधा माळी, जिल्हा पोलीस प्रमुख राजेश प्रधान, शंकर साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, आ. हनुमंतराव डोळस, सभापती राजलक्ष्मी माने-पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य बाबाराजे देशमुख, ऍड. बी. वाय. राऊत, प्रांताधिकारी भोर, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी प्रतापसिंह मरोड, पंचायत समिती सदस्या वैशाली साळवे, पी. एस. पाटील, जगदाळे, जितेंद्र सोनवणे, डी. एल. स्वामी, माळशिरस उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पाटील, नातेपुते पोलीस स्टेशनचे सुजय घाडगे आदी अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी माऊलीच्या पालखीचा जिल्ह्यात प्रवेश झाल्यानंतर तोफांची सलामी देत मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. आळंदी ते पंढरपूर या पालखी प्रवासातील सोलापूर जिल्ह्यात हा शेवटचा टप्पा असतो. सातारा जिल्ह्यातील बरड या ठिकाणचा मुक्काम संपवून सायं. ७ वा. माऊलीचा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने पुढे सरकला.
रस्त्याच्या उजव्या बाजूला शंभू महादेवाचा डोंगर लागतो. वारकरी मोठ्या उत्साहात ग्यानबा-तुकारामचा जयघोष करीत पुढे चालत होते. माऊलीच्या रथात विराजमान झालेल्या पादुका आपल्या वैभवी लवाजम्यासह पुढे सरकत होत्या. पालखीच्या पुढे असणार्या मानाच्या अश्वाचे पूजन डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. माऊलीच्या पालखी सोहळ्याबरोबर रथाच्या पुढे २९ दिंड्या व मागे २१० ते २५० दिंड्या असून, यावेळी आळंदी देवस्थानचे मानकरी व सदस्य या पालखी सोहळ्यांचे हैबतबाबाचे वंशज यांचाही सन्मान करण्यात आला. तसेच सोहळाप्रमुख श्यामसुंदर मुळे, चोपदार बाळासाहेब, राजाभाऊ यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पालकमंत्री लक्ष्मणराव ढोबळे म्हणाले की, शासनाच्या वतीने वारकर्यांसाठी सर्व सेवासुविधा करण्यात आल्या असून, पाणीटंचाईचे संकट असले तरी सर्व पातळीवर पाणीपुरवठा व वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. [वृत्ताभारती- http://vrittabharati.in/]

No comments:
Post a Comment