इचलकरंजी,(वार्ताहर ) - ओंजळीत घेऊन आचमन करावे, अशीही लायकी राज्यातील तब्बल सत्तर पैकी कोणत्याही नद्यांच्या पाण्याची राहिलेली नाही. पंचगंगा तर प्रदूषित आहेच शिवाय अन्य नद्यांची अवस्थाही तशीच आहे अशी स्पष्ट कबुली देत राज्याचे पाणीपुरवठा व जलनिस्सारणमंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी काळम्मावाडीची योजना न परवडणारी नसल्याचे सांगत पुढील २५ वर्षांतील लोकसंख्येचा विचार करून पालिकेने शाश्वत पाणी योजनेचा प्रस्ताव पाठवावा त्याला मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
गेल्या दीड महिन्यापासून इचलकरंजी शहरात काविळीने थैमान घातले असून आतापर्यंत १६ जणांचे बळी गेले आहेत. या साथीच्या पाश्र्वभूमीवर आणि शहरातील पाणीटंचाईचा आढावा घेण्यासाठी लक्ष्मणराव ढोबळे इचलकरंजीत आले होते. त्यांनी प्रथम आयजीएम इस्पितळास भेट देऊन रु ग्णांची विचारपूस करून माहिती घेतली. त्यानंतर झालेल्या आढवा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
या वेळी कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेच्या उपसा पंपाची क्षमता वाढण्यासाठी नव्याने उपसा पंप बसविण्यासाठी अनुदान द्यावे, शहरातील उद्योगाला लागणारे ६ ते ७ एमएलडी पाणी पंचगंगेतून उचलण्यासाठी वेगळी वितरण नलिका टाकण्यास मंजुरी द्यावी. तर शहरास अतिशुद्ध पाणी मिळण्यासाठी अल्ट्रावायलेट यंत्रणा बसवून मिळावी अशी मागणी नगरपालिकेच्या वतीने प्रकाश आवाडे यांनी ढोबळे यांच्याकडे केली. तर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष मदन कारंडे व बांधकाम सभापती रवींद्र माने यांनी शहरातील पाणीपुरवठय़ाची अवस्था पाहता आणखी शंभर बोअर मारण्यास मंजुरी द्यावी, अशी मागणी केली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. ढोबळे यांनी सांगितले, की शहराला कृष्णा नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा केला जातो. ५४ एमएलडी पाणी उपसा करण्यास मंजुरी असली, तरी चाळीस ते पंचेचाळीस एमएलडी पाणीउपसा केला जातो. त्यामुळे पाणीउपसा पंप बदलण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा. शहरात पाण्याची गरज असलेल्या वीस ठिकाणी बोअर मारण्याची मागणी करावी, तर शहराला शुद्ध पाणी मिळण्यासाठी अल्ट्रावायलेट यंत्रणा बसविण्याबाबतचा प्रस्ताव द्यावा.
या सर्व प्रस्तावाबाबत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर बैठक घेऊन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. पंचगंगेचे पाणी प्रदूषण करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेला तब्बल एकशेचाळीस वेळा नोटिसा बजावल्या. परंतु कोणतीही कारवाई झाली नाही. अशा प्रकारामुळे राज्यातील सत्तर नद्यांचे पाणी पिण्याच्या लायकीचे राहिलेले नाही. त्यामुळे प्रदूषित नद्यांचे शुद्धीकरण करण्यासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनेतून प्रस्ताव पाठविले असल्याचे ढोबळे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment