पिंपरी-चिंचवड : महापालिकेनं जाहीर केल्याप्रमाणे दीड लाख रुपयांतच घरकुल मिळावे, या मागणीसाठी शनिवारी पिंपरीत घरकुल लाभार्थ्यांनी थाळीनाद आंदोलन केले. हे आंदोलन कष्टकरी कामगार पंचायतीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली झाले.
महापालिकेने घरकुलाची किंमत वाढवून लाभार्थींना पावणेचार लाख रुपये भरण्यास सांगितले आहे. त्यासाठी प्रथम पाच जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. महापौर मोहिनी लांडे यांनी ही मुदत एक महिन्याने वाढवून पाच ऑगस्ट करण्यात आल्याची घोषणा कालच केली, मात्र त्यामुळे लाभार्थींचे समाधान झालेले नाही. जाहीर केल्याप्रमाणे दीड लाख रुपयांतच घरकुल मिळावे तसेच त्यांना राष्ट्रीय बँकेचे कर्ज मिळावे या मागणीसाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हे आंदोलन करण्यात आले. घरकुल लाभार्थींच्या आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस होता.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधा-यांनी झोपेचे सोंग घेतले असल्यामुळे त्यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे बाबा कांबळे यांनी सांगितले. दुपारी 2 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरूवात झाली. या आंदोलनासाठी घरकुल लाभार्थी मोठ्या संख्येने घरातील भांडी घेऊन सहभागी झाले होते. घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न त्वरित सोडवून पुढचा प्रकल्प लवकरात लवकर चालू करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

No comments:
Post a Comment