Sunday, June 24, 2012

कोकण रेल्वेचं रडगाणं सुरू

रत्नागिरी: मान्सून सक्रिय होताच पहिला फटका कोकण रेल्वेच्या प्रवशांना बसला आहे. गेल्या ३६ तासांपासून  कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा आणि आडवली स्टेशनदरम्यान मातीचे ढिग रुळावर वाहून आलेत. त्यामुळे गेल्या चार तासापासून कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प आहे. दरम्यान, ट्रकवरची माती हटवण्याचं काम सुरू असले तरी एक्सप्रेस गाड्या विविध स्टेशनवर थांबवण्यात आल्यात.
यामध्ये एर्नाकुलम -पुणे एक्सप्रेस रत्नागिरीत थांबवलीय. तर गरीब रथ - सावर्डे स्टेशनवर, मंगलोर एक्सप्रेस - खेड स्टेशनवर, राज्य राणी एक्सप्रेस - वीर स्टेशनवर आणि कोकणकन्या एक्सप्रेस - माणगाव स्टेशनवर थांबवण्यात आली आहे. या सर्व गाड्या डाऊन दिशेच्या आहेत. कणकवलीजवळ अप दिशेची मंगला एक्सप्रेस  खोळंबली आहे. या सर्व गाड्या साधारण चार तास उशिरा आहेत.

No comments:

Post a Comment