संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात गौताळा अभयारण्य आहे! वन्यजीवांच्या रक्षणासाठी शासनाच्या वनखात्यातर्फे अशी अभयारण्ये राखून ठेवून कोट्यवधी रुपये खर्चून तयार केली जातात, असा सर्वसाधारण जनतेचा समज आहे. मात्र, अभयारण्ये ही वन्य प्राण्यांसाठी नसून युवक कॉंग्रेससाठीच आहेत, असा युवक कॉंग्रेसच्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा समज झाला असावा, असे वाटू लागले आहे. महाराष्ट्राचे वनखाते पतंगराव कदम यांच्याकडे आहे आणि त्यांचे सुपुत्र विश्वजित कदम हे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे वनखात्याची अभयारण्ये ही प्राण्यांना अभय देण्यासाठी नसून तेथे आता मंत्रिपुत्राला आणि त्यांच्या गणंग कार्यकर्त्यांना अभय देण्यासाठी आहेत, असा त्यांचा समज झाला. या समजामधून त्यांनी गौताळा अभयारण्यात जंगी कार्यक्रम केला. अभयारण्याचे सर्व नियम आणि कायदे मोडून हा जल्लोश कार्यक्रम घेण्यात आला.
असा काही कार्यक्रम युवक कॉंग्रेसच्या युवकांनी घेतला की सर्व प्रसारमाध्यमांच्याच पोटात का दुखते? असा या युवकांचा सवाल आहे. म्हणे अभयारण्यात फक्त लोकसेवकांना म्हणजे वनखात्याच्या कर्मचार्यांनाच प्रवेश करण्याची परवानगी आहे. व्वा रे व्वा! युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांपेक्षा मोठे लोकसेवक कोण बरे असतील? युवक कॉंग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन नागपूरला काही वर्षांपूर्वी झाले होते, तेव्हा या युवकांनी किती बरे लोकसेवा केली होती! ती लोकसेवा महाराष्ट्रातील ही प्रसारमाध्यमे विसरली की काय?अगदी दिल्लीत एका युवतीला तंदूर भट्टीत जाळून कायमची मुक्ती देण्यापासून ते छोट्या मोठ्या निवडणुकांमध्ये पैसे देऊन विरोधी पक्षाच्या लोकांना फोडण्याचे सत्कर्म करण्यापर्यंत या युवक कॉंग्रेसच्या नेत्यांची लोकसेवा सतत वर्तमानपत्रात झळकत असते, तरीही या प्रसारमाध्यमांना युवक कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते हे लोकसेवक वाटत नाहीत की काय? दरमहा नियमित एक तारखेला पगार घेऊन महिनाभर टेबलावर काही वजन ठेवल्यावरच कागद हलविणार्या सरकारी नोकरांना हे लोकसेवक समजतात आणि युवक कॉंग्रेसच्या नेत्यांना,कार्यकर्त्यांना लोकसेवक समजत नाहीत,याला काय अर्थ आहे?न्यूटनने जडत्वाचा एक नियम सांगितला की बाह्यबल लावल्याशिवाय कोणताही पदार्थ आपली स्थिती बदलायला तयार नसतो. इथे सरकारी नोकर हा नियम खोटा ठरवून कागदावर वजन ठेवल्यावरच तो हलवून दाखवितात तरीही ते लोकसेवक आणि या सरकारी नोकरांच्या बदल्या, बढत्या अशी अडलेली कामे त्यांचा खिसा हलका करून करणारे युवक कॉंग्रेसचे नेते मात्र लोकसेवक नाहीत?
गौताळा अभयारण्यात झालेल्या युवक कॉंग्रेसच्या कार्यक्रमाला पार्टी असे म्हटले गेले आहे. वास्तविक कॉंग्रेस पार्टीचीच ही युवक कॉंग्रेस आहे तेव्हा यांचा ‘पार्टी’शी फार जवळचा संबंध आहे. ‘पार्टी’ म्हटलं की त्याचा एकच अर्थ युवकांना माहीत आहे. कॉंग्रेसचे एक महान खासदार गोविंदा यांच्याच एका नृत्यात त्यांनी म्हटले आहे की
अगर अंडे नही होते तो मुर्गीयॉं न होती
अगर मुर्गीयॉं न होती तो पार्टीयॉं न होती
गौताळ्याच्या अभयारण्यात अशीच एक ‘पार्टी’ नुकतीच झाली. ‘पार्टीची पार्टी!’ त्यात बडा खाना होता. अभयारण्यात आवाज करता येत नाही म्हणे, पण येथे मिक्सरसह ध्वनिवर्धक लावला होता. डॉ. विश्वजित कदम यांच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोध करणारे संगमनेरचे तांबे असोत की आणखी कोणी. या सर्वांचे वेगवेगळे आवाज एका सुरात आले पाहिजेत म्हणून या मिक्सरचा फार उपयोग असतो म्हणे! एकाच पार्टीतील वेगवेगळे आवाज समोरच्या लोकांना ऐकू न येता ते वेगळे काढून ऐकविले जातात. कॉंगे्रसच्या नेत्यांची भांडणे जितकी हवी तितकीच प्रसारमाध्यमांकडे याच तंत्रातून पाठविण्याची कला या मिक्सरमधूनच जर साध्य होत असेल, तर तो मिक्सर अशा अभयारण्यातील कार्यक्रमात वापरला तर बिघडले कोठे? मात्र, म्हणे नियमात अभयारण्यात ध्वनिवर्धक बसविण्याची तरतूदच नाही. जर अभयारण्यातील प्राणी मोठ्याने ओरडू शकतात, तर युवक कॉंगे्रसच्या कार्यकर्त्यांना लाऊड स्पीकरमधून बोलण्याला काय हरकत आहे, असा विचार करून ही यंत्रणा तेथे बसविली असावी. विश्वजित कदम यांचे आगमन होताच म्हणे फटाकेही वाजविण्यात आले. अभयारण्यातील प्राण्यांना आता त्यांच्यापेक्षाही भयंकर प्राणी अभयारण्यात आले आहेत याची कल्पना यावी म्हणून हे आवाज केले असतील, तर त्यामागील उदात्त हेतू लक्षात घेतला पाहिजे. उगाच कांगावा करायला नको. युवक कॉंग्रेसचे नेते या अभयारण्यात आल्याने कार्यकर्त्यांना जरा जास्तच अभय वाटले. त्यामुळे त्यांनी बडा खाना शिजविण्याचा बेत अगदी नियम जरा बाजूला करून केला.
काहींनी तर हा मेळावा नव्हताच असा कांगावा केला आहे. म्हणे दोन वन अधिकार्यांच्या बदल्यांचे प्रस्ताव वनमंत्र्यांकडे गेले आहेत. हे वन अधिकारी गौताळ्याचे अभयारण्य हे प्राण्यांचे अभयारण्य असले, तरी तसे न वागता हे अभयारण्य वनाधिकार्यांसाठीच आहे अशा थाटात वावरत असत. त्यांचे बदलीचे प्रस्ताव वनमंत्र्यांकडे जाताच आपल्यामागचे अभय संपले असे त्यांना वाटले आणि त्यांनी वनमंत्र्यांच्या मुलामार्फत प्रशासनाला गुंडाळण्याचा संकल्प करून त्यासाठी हा गौताळ्यात युवक कॉंग्रेसचे गणंग बोलावण्याचा घाट घातला. डॉ. विश्वजित कदम यांच्या उपस्थितीतील हा मेळावा म्हणजे युवक कॉंग्रेसची अनोखी समाजसेवा हेाती.या दोन वनाधिकार्यांची बदली रद्द करण्यासाठी आयोजित केलेली लोकसेवा! काम वनखात्याच्या अधिकार्यांचे असल्याने त्यांनी काही नियमांकडे थोडासा कानाडोळा केला तर बिघडले कोठे?त्यातही पुन्हा कॉंग्रेसच्या अल्पसंख्यक आघाडीच्या अध्यक्षाने या लोकसभा मतदारसंघातील युवक कॉंग्रेसचा जिल्हाध्यक्ष असलेल्या अल्पसंख्यक नेत्याने म्हणे या पार्टीच्या आयोजनात विशेष वाटा उचलला. मग तर या कार्यक्रमाला अडवायची हिंमत कोण करणार? एवढ्या सेक्युलर पार्टीला प्रसारमाध्यमांनी इतकी नावे ठेवण्याचे काय कारण?
आता ही पार्टी पाहून अभयारण्यातील प्राणी मात्र चांगलेच चक्रावून गेेले आहेत. माणसांच्या अभयारण्यात ‘पार्टी’ ‘पार्टी’ असा खेळ चालतो. त्यात युवकांच्या आघाड्या असतात. त्यात अध्यक्ष होण्यासाठी मतदारांना म्हणे पाकिटे द्यावी लागतात. मग निवडून आलेल्या अध्यक्षाला अशा ‘पार्ट्या’ द्याव्या लागतात. हे युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष आपल्या बाबांना सांगून वनाधिकार्यांच्या बदल्या रद्द करतात. त्यासाठी ‘पार्ट्या’ झोडतात. माणसांच्या अभयारण्यात हे भलतेच चालते हे पाहून गौताळा अभयारण्यातील प्राणी भलतेच चकित झाले, अशी खबर आहे. मात्र, असल्या पार्टीत अभयारण्यात प्राण्यांना मारून त्यांचे मांस शिजविले जाते, हा अघोरी प्रकार पाहून मात्र हे प्राणी भलतेच धास्तावले आहेत. ‘कोंबडी मेल्याचे दु:ख नाही मात्र युवक कॉंग्रेसच्या पार्ट्यांच्या नावाने काळ सोकावता कामा नये’ या वाक्प्रचारावर गहन विचार चालू आहे. या युवक कॉंग्रेसच्या प्राण्यांसाठीच वेगळी खास अभयारण्ये राखून ठेवावीत,म्हणजे त्यांचे अतिक्रमण गौताळासारख्या प्राण्यांच्या अभयारण्यावर होणार नाहीत,अशी मागणी करणारे निवेदन गौताळ्यातील प्राणी आता वनमंत्र्याकडे देणार असल्याचे समजते!वनमंत्र्यांना मुख्यमंत्री होण्याची घाई असल्याने येणारी सर्व निवेदने ते गंभीरपणे घेतात. या निवेदनाचाही त्यांनी गंभीर विचार करावा. युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी त्यांचे चिरंजीवच असल्याने गौताळ्यातील प्राण्यांच्या निवेदनाचा ते त्वरेने विचार करतील अशी आशा या प्राण्यांना लागली आहे!

No comments:
Post a Comment