पंतप्रधान धृतराष्ट्र आहेत, असे चार दिवस आधी किरण बेदी म्हणाल्या होत्या. आता काल त्यांनी आपल्याच शब्दांना कलाटणी दिली. पंतप्रधान नव्हे, तर त्यांचे कार्यालय धृतराष्ट्र आहे, असे मी म्हणाले होते, असे बेदी म्हणाल्या. त्यांचे हे स्पष्टीकरण ‘मरनेसे कौन डरता लेकीन जान से हाथ धोना पडता है...’ असे गमतीदार आहे. पंतप्रधानांचे कार्यालय धृतराष्ट्र आहे म्हणजे ते आंधळेपणाने पंतप्रधानांना सल्ले देते आणि मग मनमोहनसिंग त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवत कार्यवाही करतात, असे बेदींना म्हणावे लागेल किंवा त्यांच्या आताच्या विधानाचा हाच अर्थ निघतो. दक्षता आयोगाचा अध्यक्ष निवडताना देखील मनमोहनसिंग यांची हीच गल्लत झाली होती. त्यांनी त्याचे सगळे खापर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व त्या काळात पीएमओत राज्यमंत्री असलेले पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर फोडले. आता बेदींना धृतराष्ट्र कुठल्या अर्थाने म्हणायचे होते, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पंतप्रधानांना नव्हे, पण त्यांच्या कार्यालयाला का होईना पण बेदींना म्हणायचे आहे ते धृतराष्ट्रच, हे मात्र नक्की. मनमोहनसिंगांसारख्या व्यक्तीला धृतराष्ट्र म्हणणेे काही योग्य वाटत नाही. कुणाच्याही सुसंस्कृत मनाला वेदनाच होतील. आता बेदींना असे का म्हणावेसे वाटले असेल, याचा वेध घेण्याचा प्रयत्न आपण केलाच पाहिजे.
धृतराष्ट्र आंधळा होता. पुत्रप्रेमाने आंधळा झाला होता. आरोग्याच्या कारणाने पंडू राजगादीवर बसू शकत नसल्याने धृतराष्ट्र राजा झाला होता. (सोनियांच्या त्यागातून किंवा अपरिहार्य अगतिकतेतून मनमोहनसिंग पंतप्रधान झालेत) राजा म्हणून तो न्यायी नव्हता, दुर्योधन, दु:शासनादी पुत्र आणि त्यांचा कपटी शकुनीमामा जे कपटाचे राजकारण करत होते, ते त्याला कळत नव्हते असे नाही. मात्र, तो मूकपणे त्यांचे समर्थन करत होता. अगदी रजस्वला असलेल्या द्रौपदीचे वस्त्रहरण केले गेले, तेव्हाही तिने मारलेली आर्त हाकही त्याने ऐकून न ऐकल्यासारखी केली होती...
महाभारतातले अनेक संदर्भ आहेत. आता किरण बेदींना कुठल्या संदर्भाने मनमोहनसिंग यांना धृतराष्ट्र म्हणायचे होते, ते कळायला मार्ग नाही. मात्र, आपण वास्तवाचे समीक्षण करून अंदाज काढू शकतो. मनमोहनसिंग पुत्रप्रेमाने आंधळे होऊच शकत नाहीत. त्यांचा रक्ताचा असा कुठला राजकीय वारस नाही. ते लोकनेते नसल्याने त्यांचा मतदारसंघ नाही, तिथे कुठला वारस नाही. पक्षात त्यांचा प्रभाव असलेला गट नाही. (याच निकषांवर अगदी ‘सेफ गेम’ म्हणून त्यांची निवड करण्यात आली, असे नाही वाटत का?) हो, पक्षातील नेते, मंत्री यांची पाठराखण, नैतिकता सोडून ते करतात अन् ‘मला काहीच माहिती नाही’ अशी सोयीची भूमिका नेहमीच घेतात. त्या अर्थाने ते ‘डोण्ट नो’ नेते आहेत. अगदी कलमाडींपासून आता अण्णांनी निर्देश केलेल्या ‘त्या’ चौदा भ्रष्ट मंत्र्यांपर्यंत ते सगळ्यांचीच भलावण करतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत काय झाले, राहुलचा काहीच करिष्मा नाही, यावर ते कसलेच भाष्य करत नाही. माध्यमांना देखील त्यांच्याकडून कुठलेच भाष्य अपेक्षित नसते. कारण, ते बोलूच शकत नाहीत किंवा त्यांच्या असल्या भाष्यांना कुठलाच अर्थ नसतो, हे माध्यमांनी देखील स्वीकारलेले आहे... पण म्हणून काय त्यांना धृतराष्ट्र म्हणायचे काय?
बेदींच्या समर्थनार्थ अनेक मुद्यांना स्पर्श केला तरीही धृतराष्ट्र ही संभावना मान्य करायला मन काही धजावत नाही. त्या धृतराष्ट्राला शंभर पुत्र होते. मनमोहनसिंग यांना आघाडीचे सरकार चालवावे लागत आहे. आता घटकपक्ष म्हणजे पुत्रांप्रमाणेच. ममता नाराज झाल्या म्हणून बजेटवरील चर्चा पूर्ण होण्याआधीच ते रेल्वे मंत्र्यांचा राजीनामा घेतात. कोळशाच्या दलालीत कुणाचे हात काळे झाले हे त्यांना माहिती असूनही ते त्यावर बोलत नाहीत. टू-जी, थ्री-जीची प्रकरणे अंगलट आलेली दिसत असूनही ते चिदंबरम् यांना काहीही म्हणत नाहीत. प्रणव मुखर्जी त्यांना अधून मधून त्रास देतात. शरद पवार वाग्बाणांनी त्यांना घायाळ करतात. मुलायमसिंग देखील हवे तेव्हा वेठीस धरतात. देशातल्या अनेक महत्त्वाच्या समस्या आणि प्रकरणांवर त्यांची नेमकी भूमिका काय, ते कुणालाच कळत नाही. लष्कर प्रमुखांचे प्रकरण गाजले, आता राष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराच्या संदर्भात चर्चा गरम आहेत, पण सिंग त्यावर काहीच बोलत नाहीत. अशी काही साम्यस्थळे सापडतात म्हणून काय त्यांना थेट धृतराष्ट्र म्हणायचे काय? आपल्या चमूतील मंडळी बेताल बडबड करून आंदोलनाचे नुकसान करताना दिसत असूनही अण्णा नाही का गप्प बसत? त्यांची काय अगतिकता असेल? तशीच काही अडचण मनमोहनसिंग यांची देखील असू शकते ना?
हो, आता महागाईने देश होरपळतो आहे. पेट्रोलची दरवाढ तर जनतेचे सुखाने जगण्याचे मनसुबे गाडून टाकणारीच आहे. दरडोई उत्पन्नाचे आकडे चिंताजनक आहेत. त्यात ३३ रुपयांत माणसे छान जगू शकतात, असे अहलुवालिया म्हणतात. आपले जगणे घासत, ओढत कसेबसे समोर करणार्यांच्या जखमांवर मीठच चोळणे झाले. राष्ट्रकुल असो की मग परराष्ट्र मंत्र्यांचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवरचे विदुषकी चाळे असोत, देश नागविला जातो आहे. देशांतर्गत दशहतवाद, नक्षलवाद यांनी उच्छाद मांडला आहे. शेतकर्यांच्या आत्महत्यांंना पॅकेजेसचे ठिगळ जोडले तरीही गळती काही थांबत नाही. देश भ्रष्टाचाराने पोखरला जातो आहे. तो थांबविण्यासाठी चळवळ आणि चिंतन या पातळीवर आंदोलनांनी जोर पकडला आहे. त्यांच्या पाठीशी उभे राहून भ्रष्टाचार थांबविण्यासाठी नेमके काय करता येईल, याचा विचार करण्यापेक्षा आंदोलनकर्त्यांनाच देशद्रोही ठरविण्याचा प्रयत्न होतो आहे. चीनने आर्थिक पातळीवर घुसखोरी केली आहे. त्यांनी पूर्वांचल जवळपास तोडला आहे. पाकिस्तानच्या मुजोर्या संपतच नाहीत. देशीय अस्मितेची द्रौपदी अशी नागविली जात असताना तिचा आर्त टाहो पंतप्रधानांना ऐकूच जात नाही किंवा मग ऐकूनही ते न ऐकल्यासारखे करतात... हे खरेच आहे. हो, त्यांच्या या सगळ्याच बाण्याने त्या पौराणिक पात्राची आठवण होते. म्हणून काय कसेही का असेना, पण एवढ्या महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीला धृतराष्ट्र म्हणायचे काय?
हेही खरेच आहे की धृतराष्ट्र राजा असूनही निसर्गानेच त्याच्यावर अन्याय केला होता. त्यामुळे तो प्रत्यक्ष युद्धात उतरू शकत नव्हता. युद्धाचा ‘आंखो देखा हाल’ त्याला संजयानेच सांगितला. मनमोहनसिंग यांना देखील अनेक गोष्टी दूरचित्रवाणीवरच कळतात. त्यांना माहिती असणे अनुस्यूत असलेल्या अनेक गोष्टी त्यांना माहितीच नसतात. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीतील दारुण पराभवाचे वृत्त ते दूरचित्रवाणीवर बघतात. गोव्यात त्यांच्या काही सभा होतात, पण साध्या नगरसेवकाच्या सभांना असते तेवढी देखील गर्दी पंतप्रधानांच्या सभांना नसते. ते कसलाच प्रभाव सोडत नाहीत. गेल्या सात-आठ वर्षांत देशवासीयांना अभिमान वाटावा किंवा छाप सोडून गेले, अशी कुठलीच गोष्ट त्यांच्याबाबत सांगता येत नाही. महागाईच्या नावाने ओरड झाल्यावर आत्ता त्यांनी काही उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला, पण तोही लुटूपुटूचाच होता. रिझर्व्ह बँकेचे रेपोदर वारंवार वाढवून नेमके काय होणार? महागाईचा दर काही कमी होत नाही. गरिबांची नाडवणूक होणारे पेट्रोलचे दर वारंवार वाढवून नंतर डिझेलच्या गाड्यांवर कर वाढविण्याने नेमके काय साध्य होणार असते? रात्री झोपताना मी पंतप्रधान होतो आणि सकाळी उठल्यावरही मीच पंतप्रधान आहे, हीच त्यांच्या दैनंदिन समाधान आणि आनंदाची बाब असू शकत असेल, तर मग प्रभावी नेता म्हणून काय काम करणार? पक्षातले आणि मित्रपक्षातले शकुनी खेळ्या खेळत आहेत. देश नागविला जातो आहे आणि अण्णा- बाबा त्यांना काही गोष्टींची मागणी करतात तेव्हाच काय तो सिंग यांना कंठ फुटतो आणि धृतराष्ट्राच्या थाटातच ते ‘सुईच्या अग्रावर मावेल एवढीही जमीन देणार नाही,’ याप्रमाणे भ्रष्ट मंत्र्यांच्या चौकशीला, सक्षम लोकपालाला ठाम नकार देतात. गेल्या दशकात ठामपणे केलेली त्यांची ही एकमेव गोष्ट आहे. अढळ असेलच काही तर दहा जनपथवरील निष्ठा आहे...
ही साम्यस्थळे आहेत म्हणून त्यांना धृतराष्ट्र म्हणायचे अन् तेही सात्त्विक आंदोलनकर्त्यांनी म्हणायचे हे काही पटत नाही. किरण बेदींनी म्हटले तर म्हटले अन् विधान मागेही घेतले. हेही चुकीचेच. आक्षेप घेणार्यांना त्यांनी ‘माझे विधान खोडून दाखवा’ असे आव्हान द्यायला हवे होते. याउलट त्यांनी आपले विधान मागे घेतले. डोळे असणे, दिसणे आणि नजर असणे यात फरक आहे. अलीकडच्या काळात देशाच्या नेतृत्वाने दृष्टीच गमावली असल्याने कर्मांधळेपण आलेले आहे. यावर अजीम प्रेमजी आणि नारायण मूर्तींसारख्या विवेकी उद्योगपतींनाही चिंता वाटते. नेत्यांच्या असल्या दृष्टिशून्य वागण्याने देश होरपळत असताना नेमक्या कुण्या एकाला टार्गेट करून धृतराष्ट्र ठरविणेही चुकीचे वाटल्याने बेदींनी वक्तव्य बदलले असेल...

No comments:
Post a Comment