हैदराबाद, (वृत्तसंस्था) : वाय एस आर काँग्रेसचे अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांना १२ जूनला होणाऱ्या पोटनिवडणुकीच्या तोंडावर तुरुंगात टाकून त्यांचे राजकारण ‘गोठविण्या’चा काँग्रेसचा डाव उलटला असून जगन यांच्या मातोश्री आणि पक्षाच्या मानद अध्यक्षा विजयम्मा यांच्या सभा आणि पदयात्रांना भर उन्हात हजारो लोक गर्दी करीत असल्याने काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे.
पैशाच्या जोरावर जगनमोहन रेड्डी यांचे राजकारण वाढत असल्याने बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपावरून त्यांची सीबीआय चौकशी व अटक करण्याचा डाव ऐन निवडणुकीच्या तोंडावर आखला गेला. त्यानुसार जगन यांना अटक झाली आणि शुक्रवारच्या सुनावणीतही त्यांना जामीन मिळाला नाही. जगन तुरुंगातच राहिले तर त्यांच्या पक्षाचा प्रभाव ओसरेल, असा तर्क होता. प्रत्यक्षात विजयम्मा यांनी गुरुवारपासून सभा आणि पदयात्रांचा धडाका लावला असून त्यांना लोकांचा वाढता पाठिंबा लाभत आहे. प्रत्येक सभेत त्या आपले पती व लोकप्रिय मुख्यमंत्री वायएसआर रेड्डी यांच्या विमान अपघातातील मृत्यूमागे काळेबेरे असल्याचा आरोप करीत आहेत. वायएसआर यांची स्मृती लोकांमध्ये ताजी करण्याचाही त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या सभांना वाढती गर्दी पाहून काँग्रेसचे काही आमदारही वायएसआर पक्षात थडकत आहेत.
या सर्व घडामोडींमुळे काँग्रेसचे धाबे दणाणले असून या आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी त्यांनी विधानसभाध्यक्षांकडे केली आहे. त्याचबरोबर पोटनिवडणुकांचे निकाल म्हणजे जनतेचा सार्वत्रिक कौल वा काँग्रेसची परीक्षा नव्हे, असा पवित्राही पक्षाने घेतला आहे.

No comments:
Post a Comment