पाटणा,(वृत्तसंस्था) : रणवीर सेनेचा प्रमुख ब्रोश्वरसिंग याच्या अंत्ययात्रेला शनिवारी हिंसक वळण लागले. ब्रोश्वरसिंगच्या समर्थकांनी पोलीस ठाणी, खासगी वाहने तसेच पोलिसांच्या वाहनांना आगी लावल्या. याखेरीज त्यांनी बेले रोड दीर्घकाळ रोखून ठेवला.
आरा शहरापासून पाटण्यापर्यंतच्या ४० किलोमीटरच्या रस्त्यावर अंत्ययात्रेत सहभागी झालेल्या ब्रोश्वरसिंगच्या शेकडो चाहते व समर्थकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. याखेरीज दाणापूर, बिहता येथे थांबवून ठेवण्यात आलेल्या खासगी मोटारसायकलींना या जमावाने आगी लावल्या. भागलपूर,आरा आणि पाटणा येथील अनेक भागांत रस्ते रोखून ठेवण्यात आले होते.
ब्रोश्वरसिंगच्या हत्येनंतर राज्यात सर्वत्र अतिसावधानतेचा इशारा देण्यात आला असून पोलीस महासंचालक अभयानंद व ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी बैठक घेऊन कायदा सुव्यवस्था परिस्थितीचा आढावा घेतला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.पी.ठाकूर व अन्य काही आमदार ब्रोश्वरसिंग याच्या पार्थिवावर पुष्पहार घालण्यासाठी आले असता अंत्ययात्रेतील काही व्यक्तींनी ठाकूर यांच्याशी गैरवर्तन करून त्यांना मोटारीबाहेर ओढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ठाकूर यांच्या मोटारीवर दगडफेकही करण्यात आली. त्यावेळी अनिलकुमार हे आमदार जखमी झाल्याचे समजते.
दरम्यान, राष्ट्रीय जनता दलाचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव व लोकशक्ती जनता पार्टीचे अध्यक्ष रामविलास पासवान व राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांनी ब्रोश्वरसिंग याच्या हत्येप्रकरणी केंद्रीय गुप्तचर विभागाकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.

No comments:
Post a Comment