कोलकाता,(वृत्तसंस्था -रविवार, ३ जून २०१२) : देशात वैचारिक पातळीवर लोकांचा संयम सुटत असल्याबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी चिंता व्यक्त केली. ही वाढती संकुचित मनोवृत्ती देशातील तरुणांच्या सर्जनशीलतेला, उपक्रमशीलतेला, कल्पकतेला आणि प्रयोगशीलतेला मारक ठरण्याचा धोका असून तो टाळण्यासाठी तर्कशुद्ध विचाराची कास धरण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली.
इंडियन सायन्स काँग्रेसच्या शताब्दी समारंभात संस्थेचे मानद अध्यक्ष या नात्याने ते बोलत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व्यासपीठावर उपस्थित होत्या. पुढील वर्षी होणाऱ्या परिषदेत ‘भविष्यातील भारताच्या जडणघडणीत विज्ञानाचे स्थान’ हा बीजविषय राहील, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या विचाराच्या विरुद्ध विचार ऐकण्याची क्षमता आता ओसरत आहे. सार्वजनिक चर्चाना वेगाने भडक रंग देता येऊ लागला आहे. सांस्कृतिक व वैचारिक विविधतेला समान स्थान देण्याची आणि सामाजिक सौहार्द जपण्याची भारताची दीर्घ परंपरा आहे. विचारांचा लढा तर्कशुद्ध विचारांच्याच पातळीवर करण्यातही आपण एकेकाळी अग्रस्थानी होतो. आपले ते गुण नव्याने जोपासले पाहिजेत. त्यासाठी वैज्ञानिक मनोधारणा आणि सजग जाणीव यांच्या आधारे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा खरा अर्थ आपण जाणून घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
आपल्या प्रगतीत आपण विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा म्हणावा तितका वापर करून घेतला नाही. स्थानिक पातळीवरील युवा पिढीतील सुप्त वैज्ञानिक प्रज्ञेचाही यथायोग्य शोध घेऊन विकासाला चालना देण्यात आपण कमी पडलो, असेही त्यांनी सांगितले. यापुढील काळात या त्रुटी दूर करण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला.

No comments:
Post a Comment