मथुरा : धार्मिक स्थळानजीकच्या पाण्याच्या वापरावरून शनिवारी मथुरेत दोन गटांत दंगल उसळली. या दंगलीत दोन जण मृत्युमुखी पडले तर दहा जण जबर जखमी झाले. जिल्हा प्रशासनाने तातडीने मथुरेत संचारबंदी लागू करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. येथून नजीकच असलेल्या कोसी कलान या गावात असलेल्या धार्मिक स्थळानजीक पाणवठा आहे. या पाणवठय़ाच्या वापरावरून शनिवारी दोन गटांत तुंबळ धुमश्चक्री झाली. या धुमश्चक्रीत दोन जण मृत्युमुखी पडले तर दहा जण जखमी झाले. संतप्त जमावाने दोन डझन घरे व दुकानांची नासधूस केली. तर खासगी वाहनांना आगी लावण्यात आल्या. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत संचारबंदी लागू केली. संचारबंदीमुळे परिस्थिती नियंत्रणात आली असली तर वातावरणात तणाव निर्माण झाला आहे. जखमींना मथुरा, आग्रा आणि फरिदाबाद येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment