पुणे,( तभा वृत्तसेवा) : अनेक लहानथोरांच्या उपस्थितीत आणि शिवगर्जना संस्थेच्या ढोलताशांच्या निनादात गिरिप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्टवीरांचे अतिशय जल्लोषात स्वागत करण्यात आले. हे गिर्यारोहक शनिवारी रात्री पुण्यात परतले, मात्र विविध संस्था व या गिर्यारोहकांच्या चाहत्यांनी रविवारी या गिर्यारोहकांचे एका शानदार मिरवणुकीने स्वागत करण्याचे आयोजन केले होते. त्यास पुणेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला.
बालगंधर्व रंगमंदिरापासून (झाशीची राणी चौक) या मिरवणुकीस प्रारंभ झाला. गार्डियन कॉपरेरेशनचे व्यवस्थापकीय संचालक मनीष साबडे, संचालक उदय जाधव, दरोडे जोग प्रॉपर्टीजचे संचालक आनंद जोग यांच्या उपस्थितीत या मिरवणुकीस दुपारी साडेचार वाजता प्रारंभ झाला. एका मोठय़ा सजविलेल्या ट्रकमध्ये गिरिप्रेमी संस्थेच्या एव्हरेस्ट मोहिमेच्या सदस्यांना उभे करण्यात आले. फटाक्यांच्या आतषबाजीने मिरवणुकीस प्रारंभ झाला. शिवगर्जना संस्थेच्या ढोलताशापथकांनी केलेल्या लयबद्ध वादनामुळे जंगलीमहाराज रस्ता परिसर दुमदुमून गेला. बालगंधर्व चौक-जंगली महाराज रस्ता-डेक्कन जिमखाना-कर्वे रोड या मार्गाने आबासाहेब गरवारे महाविद्यालयात या मिरवणुकीची सांगता झाली. रस्त्याच्या दुतर्फाही अनेक लोकांनी या सदस्यांची छायाचित्रे घेत व टाळय़ांनी स्वागत केले.
या मिरवणुकीत गिरिप्रेमी संस्थेचे अध्यक्ष आनंद पाळंदे, ज्येष्ठ गिर्यारोहक व लेखक प्रा. प्र. के. घाणेकर, संस्थेच्या संस्थापिका उष:प्रभा पागे यांच्यासह अनेक गिर्यारोहक सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे या मोहिमेतील सदस्यांचे अनेक नातेवाईकही या मिरवणुकीत सहभागी झाले होते. अनेकांनी या सदस्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. राजकीय नेते रवि चौधरी यांनी या सदस्यांना शाली देत सत्कार केला. आमदार नीलम गोऱ्हे यांनी या सदस्यांचे ‘महाराष्ट्र देशा’ हे पुस्तक देऊन कौतुक केले. या वेळी शिक्षण मंडळाचे सदस्य शिरीष फडतरे उपस्थित होते.

No comments:
Post a Comment