Monday, June 4, 2012

अधिकाऱ्यांची निवडणूक आयोगाकडे धाव

नाशिक: राज्यातील विधानपरिषदेच्या सहा जांगापैकी पाच जागांचे निकाल हाती आले. मात्र नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत घटनात्मक पेच निर्माण झाला आहे.
या जागेसाठीचे शिवसेनेचे उमेदवार शिवाजी सहाणे आणि राष्ट्रवादीचे जयंत जाधव यांना पहिल्या पसंतीच्या मतामध्ये दोघांना समान मतं मिळाली आहेत. त्यामुळे आता दुसऱ्या पसंतीची मतं मोजायची का, असा प्रश्न दोन्ही पक्षांतर्फे विचारण्यात निवडणूक अधिकाऱ्यांची मोठी गोची झाली आहे. त्यामुळे स्थानिक निवडणूक अधिकाऱ्यांनी आता राज्य निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
नाशिक विधानपरिषदेची जागा जिंकण्यासाठी २३८ मतांची गरज आहे. पण सेनेच्या सहाणे आणि राष्ट्रवादीच्या जाधव यांना प्रत्येकी २२४ मतं मिळाली. याआधी पुनर्मतमोजणीच्या आधारावर निकाल लावण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र त्यावेळीही दोन्ही पक्षांचे तीन-तीन मतं बाद झाल्याने पुन्हा पेच निर्माण झाला आहे.

No comments:

Post a Comment