नाशिक : नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का दिला आहे. कारण आजच्या विधानपरिषद निवडणुकीत नाशिकमधल्या शिवसेनेच्या उमेदवाराला मनसे थेट साथ देणार आहे.
मनसेने व्हीप काढून आपल्या पक्षातील ५० मतं शिवसेनेच्या दिशेने वळवली आहेत. नुकत्याच झालेल्या नाशिकच्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने मनसेशी दगाबाजी केली होती. त्याचाच वचपा काढण्यासाठी मनसेने हा निर्णय घेतला आहे.
दरम्यान मनसेने राष्ट्रवादीला दिलेल्या दणक्यामुळे शिवसेनेलाच मोठा फायदा झाला आहे. खरंतर नाशिकच्या महापौर पदाच्या निवडीवेळी शिवसेनेनंही मनसेविरोधीत कुरघोडी केली होती. पण तरीही मनसेनं आपली ५० मतं शिवसेनेच्या खिशात घातल्यानं सेनेच्या गोटात चैतन्य आहे.

No comments:
Post a Comment