Monday, June 4, 2012

धुळ्यात पेट्रोल पंपावर छापा

धुळे : पेट्रोलवर साडेसात रुपयांची दरवाढ जाहीर होताच, राज्यभरात अनेक पेट्रोलपंप लगेचच बंद करण्यात आले. जुनासाठा वाढीव दराने विकण्यासाठी पेट्रोलपंप चालकांनी हा घाट घातला.
पण धुळ्यात तहसिलदार आणि जिल्हा पुरवठा विभाग यांनी संयुक्तपणे पंपावर छापा मारला. पेट्रोल जुन्याच दराने विकण्याचे निर्देश या पथकानं दिले. पेट्रोल पंपाचं रजिस्टर पथकानं जप्त केलंय. या संबंधित पंपावर कारवाई करण्यात येणार आहे. तर जळगावातील अनेक पेट्रोलपंप चालकांनी पंप बंद केला, काही नागरिकांनी स्टॉक रजिस्टर मागितलं आहे. त्यानंतरच पंप चालकाने लगेच वितरणाला सुरुवात केली.

No comments:

Post a Comment