Monday, June 11, 2012

गजानन महाराज पालखी औंढा नागनाथ येथे

हिंगोली, (जि.प्र.) - श्रीक्षेत्र शेगाव येथून निघालेल्या गजानन महाराजाच्या पालखीचे विठ्‌ठल नामाच्या गजरात औंढा शहरात दि.८ जून रोजी शुक्रवारी सकाळी ११ वाजता आगमन झाले. यावेळी श्रीच्या पालखीचे ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वसंत मुळे, ग्रामसेवक रमेश मोरे, उपसरपंच माणिक पाटील यांनी स्वागत केले.
नागनाथ संस्थानच्या वतीने विश्‍वस्त डॉ.विजय निलावार, उत्तम देशमुख, सौ.शरयु देव, गणपत बांगर, पांडूरंग पाटील, निळकंठ देव, वैजनाथ पवार, शंकर काळे आदीने स्वागत केले. श्रीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी औंढा तालुक्याती हजारो भक्तगण शहरात दाखल झाले होते. यावेळी भक्ताकडून वारक-यांना अन्नदान, फराळाची व्यवस्था करण्यात आली. विठ्‌ठलनामाच्या गजराने संपूर्ण औंढा नगरी दुमदुमली. पालखीतील वारक-यांना भोजनाची व्यवस्था लक्ष्मण पाटील, नंदु पाटील, रामराव खुळखुळे यांनी केली होती. गेल्या ३० वर्षापासून ते पालखीतील वारक-यांना भोजन देत आहेत. यावेळी औंढा पोलिस ठाण्यातर्फे पो.नि.विकास तोटावार यांनी श्रीच्या पालखीला कडक पोलीस बंदोबस्त दिला होता.

No comments:

Post a Comment