Monday, June 11, 2012

सीईटीच्या परीक्षेत मराठवाड्याची बाजी

मुंबई- आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषध निर्माणशास्त्र या पदवी अभ्यासक्रमासाठी घेण्यात आलेल्या सामायिक प्रवेश परीक्षेचा (सीईटी-२०१२चा) निकाल शुक्रवारी जाहीर झाला.  वैद्यकीय आणि अभियांत्रिकीच्या सीईटीत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांनी बाजी मारली.
वैद्यकीय सीईटीत जालन्याची माधवी इंद्रानी हिने १९८ गुण मिळवून राज्यात पहिली आली तर अभियांत्रिकीमध्ये लातूरचा पुष्कर नरसीकर हा अव्वल ठरला असून त्याला १९६ गुण मिळाले आहेत.  मुंबईतून वैद्यकीय सीईटीत मुलुंड येथील वझे केळकर महाविद्यालयाचा मुस्तफा कारी हा पहिला आला असून त्याने १९५ गुण मिळवले. तो राज्यात चौथा आला. अभियांत्रिकीच्या सीईटीमध्ये मिठीबाई महाविद्यालयाची भैरवी मेहता राज्यात दुसरी आली आहे.
या परीक्षेला ३ लाख ३४ हजार ७१६ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी एक लाख १३ हजार विद्यार्थी तर १ लाख १ हजार ६९६ विद्यार्थीनींचा समावेश होता. त्यातील २ लाख १५ हजार ५८० विद्यार्थी उर्त्तीण झाले आहेत.  या परीक्षेत १९० पेक्षा अधिक गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ३९ असून, ती गतवर्षापेक्षा अधिक आहे. सोलापूर विभागात ८ हजार ८४४ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. पैकी उत्तीर्ण झालेल्यांपैकी केवळ दोघांनी १८५ पेक्षा अधिक गुण मिळवले आहेत ५९८ जणांनी शंभरपेक्षा अधिक गुण मिळवले आहेत.
या परीक्षा राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयामार्फत घेण्यात आल्या होत्या. या परीक्षेचा निकाल ाहींलशीं२०१२.ेीस, ुुु. वींश.ेीस.ळप,  ुुु. वाशी. ेीस या संकेतस्थळांवर आज शनिवारी उपलब्ध होणार आहे.

No comments:

Post a Comment