कराची, (१३ जून) : प्रसिध्द गजल सम्राट मेहदी हसन यांचे पाकिस्तानातील कराची येथील रूग्णालयात आज दुपारी १२.२२ च्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ८४ वर्षांचे होते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नसल्याकारणाने त्यांना कराची येथील आगा खॉं दवाखान्यात दाखल केले होते. डॉक्टरांच्या माहितीनुसार मेहदी हसन यांच्या फुफ्फूसाने काम करणे बंद केले होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मेहदी हसन यांचा जन्म १८ जुलै १९२७ रोजी राजस्थानामधील झूंझून जिल्ह्यातील लूणा या छोट्याशा खेड्यात झाला होता. याच गावात त्यांनी गजलचे धडे गिरवले होते. त्यांचे वडील अजीम खान आणि काका करीम खान यांच्याकडून त्यांनी गायकी शिकली होती. भारतात जन्मलेले हसन हे फाळणीच्या वेळी पाकिस्तानामध्ये स्थायिक झाले होते.'अब के बिछडे' आणि 'पत्ता पत्ता बुटा बुटा' या त्यांनी गायलेल्या गझल विशेष लोकप्रिय आहेत.

No comments:
Post a Comment