ट्युनेशियात होणार्या जस्मिन क्रांतीचे पडसाद काहिरा येथे पोहोचले तेव्हा १८ दिवसांतच होस्नी मुबारकला धक्का बसला.त्यांना वाटते की,आजपर्यंत हुकूमशहांचा जसा अंत झाला तसा त्यांचाही अंत होईल.मुबारक नशीबवान आहेत. कारण अजूनपर्यंत त्यांना फाशी दिली गेली नाही, तर फक्त आजीवन कारावासाची शिक्षा दिली आहे.जेलरने त्यांना कैदी नंबर दिला.तुरुंगाच्या नियमानुसार त्यांना मुबारक या नावाने बोलावले जात नाही, तर कैदी नंबरच्या नावाने बोलावले जाते. फाशी न दिल्यामुळे तूर्तास त्यांना जीवनदान मिळाले आहे.
तेहरीरचौकात चाललेले आंदोलन पाहून असे वाटत होते की, होस्नी मुबारकचे दिवस आता भरले आहेत.मिस्रमधील सर्वांत मोठा राजकीय पक्ष इखवानुल मुसलिमीन (इखवान ब्रदरहूड) यावर कर्नल नासीर यांच्या काळापासूनच बंदी होती.त्यांच्या अपिलावर हजारो व्यक्ती राजधानी काहिराचे प्रसिद्ध मैदान तेहरीर येथे आल्या होत्या. आंदोलन सुरू झाल्यानंतर तीन आठवड्यांच्या आतच मिस्र सेना आणि मुबारक यांच्या भाडोत्री समर्थकांनी ८०० हून अधिक क्रांतिकार्यांची कत्तल केली. नंतर हे आंदोलन अधिक तीव्र होत गेले. याचा परिणाम असा झाला की,मुबारक आणि त्यांचे समर्थक सत्तेपासून दूर होत गेले.
मिस्र जनता दु:खी व निराश
निवडणुकीच्या घोषणेने सामान्य लोकांमध्ये धाडस निर्माण झाले आणि मिस्रतील सर्वांनी असा विचार केला की, या भ्रष्ट सत्ताधीशांचे पतन होणे आवश्यक आहे. परंतु, निवडणुकीनंतर येणार्या सरकारची प्रतिमा जशीजशी स्पष्ट होत गेली, तसतसा त्यांचा विश्वासही डगमगू लागला. मिस्रचे माजी राष्ट्रपती आणि त्यांच्या कुटुंबास कडक शासन होईल की नाही? ही धारणा सामान्य वाटत होती. कारण मिस्रमध्ये सत्तापरिवर्तन झाल्यानंतर होस्नी मुबारक आणि त्यांच्या समर्थकांना दिलेल्या दंडामुळे मिस्र जनता दु:खी आणि निराश आहे.त्यांना वाटत होते की,मिस्रला बरबाद करणार्याला मृत्युदंड द्यावा व ज्यांनी आंदोलनात कत्तली केल्या त्यांना सर्वांसक्षम फाशी द्यावी.परंतु, मिस्रमधील निवडणूक लढणार्या राजकीय पक्षांना आणि क्रांतिकार्यांना आता हे स्वप्न अपूर्ण राहिल्याचे भासू लागले आहे. त्यांना असे वाटते की, या पापी लोकांना फाशी देण्याऐवजी त्यांना माफी देण्याचे षडयंत्र रचले जात आहे. काही दिवसांपूर्वी मुबारकला फाशी देण्याऐवजी आजीवन कारावास देण्यात आला. मुबारकने हा दंडही स्वीकारला नाही. प्रथम त्यांना तुरुंगात पाठविण्यात आले, परंतु नंतर त्यांना एका आधुनिक रुग्णालयात उपचारासाठी स्थानांतरित करण्यात आले. या घटनेने मिस्र जनतेत असंतोष पसरला आहे. हा प्रकार क्रांतिकारकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखा आहे. मुबारकच्या दोन्ही पुत्रांनी, वडील सत्तेत असताना मिस्र जनतेवर खूप अत्याचार केला आणि मिस्रची संपत्ती लुटली,पण त्यांना निर्दोष सोडले गेले. मुबारकची पत्नीही भ्रष्ट आहे,आता तिला त्यांच्या सेवेसाठी बोलावले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मुबारक यांची तब्येत सुधारावी यासाठी त्यांच्याजवळ पुत्राला थांबण्यास परवानगी दिली होती.दुसरीकडे मुबारकचे समर्थक अत्याचारी अधिकारी निवडणूक लढवून संसदेत जाण्याची तयारी करत आहेत. नोकरशाहीशी जोडलेले हजारो लोक मुबारकचे समर्थक बनून त्याची सेवा-शुश्रूषा करत आहेत. पूर्वी अधिकारी असलेले लोक निवडणूक लढवून संसदेत जाण्याच्या तयारीत आहेत. जनतेला वाटते की, षडयंत्र रचून तेहरीर चौकातील आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय वातावरण पाहता असे वाटते की,काही दिवसांतच निवडणुकीच्या माध्यमातून भ्रष्ट मुबारक पुन्हा सत्तेत येईल.
निर्दोष ठरविण्याचा प्रयत्न
होस्नी मुबारक यांचे जरी निधन झाले, तरी काहिरा येथे पुन्हा त्यांची सत्ता येईल.बाहेरील शक्ती या मिस्रमधील आंदोलनाला दडपून मिस्रला पुन्हा कठपुतली बनवतील. मिस्र जनतेला पूर्णत: विश्वास आहे की, माजी पंतप्रधान अहमद शफीक जे सध्या राष्ट्रपतिपदाचे उमेदवार आहेत, ते निवडणूक जिंकून सत्ता मिळवतील. म्हणून त्यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात निदर्शने केली जात आहेत. अल् तेहरीर मैदान अजूनही विरोधकांनी भरलेले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे या आंदोलनात होस्नी मुबारक यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणात जनता एकत्र येऊन मागणी करत आहे की, मुबारकला फाशी द्यावी, तर दुसरीकडे या मैदानात मुबारकचे समर्थकही आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, आंदोलनकर्त्यांनी मुबारक यांच्यावर जे आरोप लावले आहेत ते खोटे आहेत. अमेरिका मुबारकला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असे मिस्रमधील प्रसारमाध्यमे स्पष्टपणे प्रकाशित करत आहेत. मुबारक यांचे समर्थक आणि विरोधी दोघेही मुबारक यांना दिल्या गेलेल्या दंडाशी सहमत नाहीत. विरोधी त्यांना मृत्युदंड देण्याची मागणी करत आहेत, तर त्यांचे समर्थक त्यांना निर्दोष घोषित करण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहेत.
यामध्ये इखवान ब्रदरहूडचे उमेदवार शफीक पंतप्रधान होते. क्रांतिकारकांचे म्हणणे आहे की, जी व्यक्ती मुबारक यांच्या शासनाशी जोडली गेलेली आहे, ती कशी काय राष्ट्रपती पदासाठी उमेदवार होऊ शकते? ते कोणत्याही पक्षाचे असोत, परंतु आंदोलनाचे विरोधक स्वत:ला राष्ट्रपतिपदाचे उमेदवार कसे समजू शकतात? यावरून स्पष्ट होते की, मुबारक शासनाच्या काळातील तत्त्वे आजही सक्रिय आहेत. मुबारक विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केला आहे की, काहिरामध्ये सौदी अरबच्या राजदूताची हत्या करण्याचा प्रयत्न कुणी केला? आणि स्वेज नहर आणि सिंकदर्याजवळ झालेल्या दंगली कुणी घडवून आणल्या? यावरून स्पष्ट होते की, मिस्रमधील क्रांतीला दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. अमेरिकेव्यतिरिक्त यापाठीमागे कोण असू शकेल? अमेरिकेला राजकारणही करायचे आहे आणि इस्रायलमधील आपल्या समर्थकांचाही बचाव करायचा आहे. संपूर्ण जगाला माहीत आहे की, अनवर सादातवर दबाव आणून कॅम्प डेविड समझोता इस्रायलच्या बाजूने घडवून आणला. यामुळे अरब राष्ट्रांत फूट पडली आणि इस्रायलच्या सिनाई प्रदेशात येण्या-जाण्याचा मार्ग मोकळा झाला. यामागे अमेरिकेचा हात तर नसेल? एकीकडे राष्ट्रपतिपदासाठी निवडणूक होत आहे, तर दुसरीकडे संसदीय निवडणूक आणि राष्ट्रपतिपदासाठी होणार्या निवडणुकीची पहिली पायरी पूर्ण होऊनही सत्ता, सैनिक परिषदेच्या ताब्यात आहे.
आता सैनिक परिषदेचा काही हक्क राहणार नाही, कारण संसदीय निवडणुकीत इखवान ब्रदरहूडची राजकीय शाखा फ्रीडम ऍण्ड जस्टिस पार्टीने ५० टक्के आणि इतर इस्लामी कट्टरवाद्यांची मते मिळवली तर त्याची संख्या ७० टक्के होते. यानुसार कट्टरवाद्यांचे मोहम्मद मरसी हे उमेदवार राष्ट्रपतिपदासाठी अग्रस्थानी आहेत. १६ आणि १७ जूनला डॉक्टर मरसी आणि अहमद शफीक यांच्यात स्पर्धा होईल. आतापर्यंत राष्ट्रपतिपदासाठी १३ उमेदवार होते. त्यातील ११ जणांनी आपले नाव मागे घेतले. आता केवळ डॉक्टर मरसी आणि शफीक अहमद यांच्यात स्पर्धा आहे. ११ जण मागे सरकल्याने त्याचा लाभ कुणाला होईल, हे सांगणे कठीण आहे. अशा प्रकारे तेहरीर चौकात होणार्या आंदोलनाचे दोघेही प्रतिनिधी मानले जात आहेत. परंतु, इखवान कट्टरवाद्यांचे म्हणणे आहे की, शफीक अहमद हे मुबारकचेच एजंट आहेत. जर ते निवडून आले तर तेहरीर चौकात होणार्या आंदोलनावर पडदा पडू शकतो. सामान्य जनता शफीक अहमद यांच्याविरुद्ध आहे. जर असे नसते तर शफीक अहमदच्या घरावर हल्ला का झाला असता? मिस्र जनता जाणून आहे की, ही व्यक्ती मुबारक आणि अमेरिका दोघांची एजंट आहे. शफीक निवडून आल्यास अमेरिका पुन्हा मिस्रवर आपले वर्चस्व गाजवेल. तेहरीर चौकात जे ८०० लोक शहीद झाले याला तत्कालीन प्रधानमंत्री शफीक अहमद हे पूर्णत: जबाबदार आहेत. कोण जिंकेल, हे सांगण्याच्या मन:स्थितीत कोणतेही प्रसारमाध्यम नाही. परंतु, भूमध्य सागराच्या आसपासचे राजकारण नेहमी सर्व जगाला प्रभावित करते. जेव्हा विश्वाचे दोन भागात विभाजन झाले तेव्हा कर्नल नासिर रशियाचे समर्थक होते. स्वेज नहरसाठी जे युद्ध झाले त्यात अमेरिकन सैनिक असणारे देश ब्रिटन आणि फ्रान्स या दोघांचा पराभव झाला. अमेरिकेच्या मंत्रिमंडळासाठी हा मोठा धक्का होता, परंतु रशिया महाशक्तीच्या पदावर आरूढ होऊ शकला नाही. त्यानंतर अरब आणि इस्रायलच्या युद्धात सर्वांत अधिक घायाळ झालेल्या अनवर सादातने कॅम्प डेविडला जाऊन इस्रायलशी मैत्री केली. त्यानंतर अरबजगताने त्यावर बहिष्कार घातला, तरीही अमेरिकेच्या समर्थनामुळे ते टिकून राहिले. त्यांना याचा परिणामही भोगावा लागला आणि शेवटी कट्टरवाद्यांनी त्यांची हत्या केली. इतके होऊनही होस्नी मुबारक राष्ट्रपती बनले. म्हणजेच आतापर्यंत ५५ वर्षांपासून सतत अमेरिका या क्षेत्रावर वर्चस्व राखून आहे. मिस्रच्या सीमा इस्रायलशी मिळतात. जस्मिन क्रांतीनंतर सर्व कट्टरवादी एका झेंड्याखाली आले आहेत. म्हणून अमेरिका शेवटच्या श्वासापर्यंत होस्नी मुबारकच्या समर्थनात राहणार. जगातील मुस्लिम आतंकवाद्यांचे जे मास्टर प्लॅन असेल तेच इखवान ब्रदरहूडचेही आहे. त्यामुळे आतंकवादी शक्तिशाली बनू नये, असे अमेरिकेला वाटते. म्हणून अमेरिका स्वत:च्या मनाप्रमाणे होण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे,परंतु मिस्र हातातून गेल्यावर मुस्लिम ब्लॉकचा किल्ला ढासळला, तर अमेरिकेवर याचा मोठा परिणाम होणार, यात आश्चर्य नाही.

No comments:
Post a Comment