नुकताच पंजाबचे पोलिस महासंचालक शशिकांत यांनी राज्य सरकारकडे एक प्रस्ताव पाठवला. त्यात ते म्हणतात की, ‘‘पंजाबमध्ये विविध तुरुंगात अनेक कैदी दीर्घ काळापासून शिक्षा भोगत आहेत. ते आपल्या वैवाहिक सुखाला पूर्णपणे मुकले आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात असुरक्षित लैंगिक संबंधांविषयी आकर्षण निर्माण होत आहे. अशा संबंधांपासून उद्भवणारा धोका टाळण्यासाठी कैद्यांना त्यांच्याच हक्काच्या जोडीदारासोबत शारीरिक संबंध ठेवण्याची परवानगी द्यायला काहीच हरकत नाही.’’
फक्त शरीरसुखाचेच का, त्यांना आणखीही अनेक कौटुंबिक सुखापासून वंचित राहावे लागते. नव्हे, त्यांना मुद्दाम वंचित ठेवले जाते, तो शिक्षेचाच एक भाग असतो. जसे, आपल्या मुलाबाळांसोबत, इतर कुटुंब सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालविता येत नाही, सण साजरे करता येत नाही, सार्वजनिक मनोरंजनाच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येत नाही, मित्र व आप्तेष्टांच्या लग्नाला उपस्थित राहता येत नाही, आणखी बरेच काही... त्याचे काय? त्यासाठीही काही उपाययोजना करणार का?
जन्मठेप, दीर्घ सश्रम कारावास या शिक्षा झालेल्या गुन्हेगारांनी, समाजामध्ये राहत असताना, माणुसकीला काळिमा फासणारे महाभयंकर अपराध केलेले असतात. कुणाचा जीव घेतला असतो, कुणाच्या मुलीवर, बायकोवर, बहिणीवर पाशवी बलात्कार केलेला असतो, कुणाचा तरी संसार उद्ध्वस्त केला असतो. यावर सारासार विचार करूनच न्यायमूर्तींनी भारतीय दंड विधानाप्रमाणे कायदेशीर शिक्षा केलेली असते. हे मान्य आहे की, अपराध्याला शिक्षा केल्याने मेलेला मनुष्य जिवंत होत नाही. गेलेली अब्रू परत येत नाही, पण महत्त्वाचे म्हणजे वचक तर बसतो. दुसरे होऊ घातलेले अपराध तर वाचू शकतात. अपराध्याला दया दाखवून शिक्षा देणे बंद करा व पाहा अपराधी किती निगरगट्ट होतात ते. तेव्हा शिक्षा देणे अनिवार्य आहे. येथे अधिकची दयामाया, करुणा, खोटी माणुसकी दाखवून समाज अजून बिघडण्याची जास्त धास्ती आहे. शशिकांत हे एक वरिष्ठ पोलिस अधिकारी आहेत, माणुसकीला कलंक असणारे भयंकर अपराधी त्यांनी जवळून पाहिले असतील, तरीही ते इतक्या हळवेपणाने वागतात, हे पाहून आश्चर्य वाटते. पोलिस अधिकार्याने कर्तव्यदक्ष राहून कायद्याचे कठोरपणे पालन व अंमलबजावणी करणे अपेक्षित आहे. दया जरूर दाखवावी, पण जिथे माणुसकीचा ओलावा असेल तिथे. त्याने केलेल्या गुन्ह्याचा बदला घेण्याची भावना इथे नाही. पण, ते कर्तव्यपालन आहे, हे विचारात घ्यावे. इथे भावनाप्रधान होऊन चालायचे नाही.
पाच वर्षांच्या एका बालिकेवर अमानुष बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करणार्या नराधमाला, न्यायदेवतेने मृत्युदंडाची शिक्षा दिली असताना, आपल्या राष्ट्राध्यक्षांनी खोटी करुणा दाखवत, ती बाद ठरवून त्याचे जन्मठेपेत रूपांतर केले, हे समर्थनीय कसे काय असू शकते? खेळण्या-बागडण्याचे वय असलेल्या त्या निरागस बालिकेवर- जिला बलात्कार म्हणजे काय हेसुद्धा कळले नसेल- अशा कोवळ्या बालिकेवर असा अमानवी प्रसंग आणणार्या त्या क्रूरकर्म्याला जिवंत राहण्याचा अजीबात अधिकार नाही, मृत्युदंड हीच सर्वथैव शिक्षा होय. त्याला खोटी दया-माया दाखवून राष्ट्राध्यक्षांनी आपला अधिकार वापरून जीवदान दिले, हे अनिष्ट आहे.
शशिकांत असेही म्हणतात की, काही पाश्चात्त्य देशांमध्ये, कैद्यांना अशी परवानगी दिली जाते आणि त्यात गैर काही नाही. पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्याचे आम्हा भारतीयांना काही एक कारण वा आवश्यकता नाही. हे भारताच्या विद्यमान कायदे व प्रथांविरुद्ध होईल, यावर दुमत असेल असे वाटत नाही. आपण काहीतरी वेगळे व भव्यदिव्य करतो आहोत, अशा भावनेतून हा असा समाजविघातक विचार पुढे आलेला दिसतो. तो रास्त नाही. गुन्हेगार दिवसेंदिवस अधिकाधिक कोडगे, बेफिकीर, निर्ढावलेले व क्रूर होत आहेत. अपवाद असतीलही. वचक हा शब्दच कारागृहांच्या व अपराध्यांच्या शब्दकोशातून बाद करावा लागतो की काय, इतकी कारागृहाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. भ्रष्टाचाराच्या अतिरेकामुळेही असेल कदाचित, पण आजकाल तुरुंगात अगदी सहजपणे दारू, ड्रग्ज, मोबाईल, स्पे. जेवण, ऐशोआरामाच्या अनेक गोष्टी खुलेआम मिळतात, असे म्हणतात. अर्थात तो एक वेगळाच विषय आहे व मूळ विषयांतर करणारा आहे. असो. या भयंकर गुन्हेगारांमुळे ज्यांना आपल्या प्रिय व्यक्तींना कायमचे गमवावे लागले होते अशा लोकांना शशिकांत यांचा विचार वाचून किती भयंकर मनस्ताप, संताप व यातना होतील याचा विचार न केलेला बरा!
पाश्चात्त्यांच्या देशातली संस्कृती आपल्या संस्कृतीहून भिन्न आहे तसेच त्यांचा एकंदर शिक्षणाचा स्तर, आचारविचार, मानसिक जडणघडण, संस्कार, त्यांचे रीतिरिवाज आपल्या भारतापेक्षा सर्वतोपरी वेगळे आहेत, म्हणूनच तिकडे आहे म्हणून आपल्याकडे सुरू करा, हा युक्तिवाद अयोग्य व अनुसरणीय नाही. या अशा अनावश्यक गोष्टी आपल्या अर्धशिक्षित समाजात, भलतेच जटिल व अनाहूत प्रश्न निर्माण करू शकतात, तेव्हा हा प्रयोग न केलेलाच बरा. कैद्यांच्या उन्नतीसाठी, विकासासाठी व मुख्य म्हणजे मतपरिवर्तन घडवून आणण्यासाठी, इतर पुष्कळ समाजोपयोगी उपाय, इलाज आपल्याकडे आहेत, त्याचा अवलंब करणे उचित ठरेल. बाहेरील सद्वर्तनी स्त्रियांना (कैद्यांच्या पत्नींना) अशा कामासाठी, कारागृहात आणण्याने नको त्या अनिष्ट, अनैतिक गोष्टींना आमंत्रण दिल्यासारखे होईल व कारागृहांची शिस्तही धोक्यात येऊ शकते.
उपरोक्त विषयासंबंधी भारतीय न्यायव्यवस्थेचे काय मत आहे, हे सर्वप्रथम जाणून, तपासून घेणे अगत्याचे व अत्यावश्यक ठरते. आपण केलेल्या दुष्कृत्यांची ही शिक्षा आहे, याची अपराध्यांना पूर्णपणे जाणीव होऊ द्या, त्याबद्दल उपरती होऊ द्या, त्याशिवाय त्यांची त्या पापांपासून सुटका नाही. कैद्यांना शिक्षा दिल्याने, शिक्षा देणार्याने, मी माणुसकी सोडली, असा अपराधीभाव मनात आणू नये. ते त्यांचे कर्तव्यच ठरते. पश्चात्तापानेच पापे धुतली जातात व अपराधीमन पुन्हा निर्मळ होते, हीच भारतीय संस्कृतीची शिकवण आहे.

No comments:
Post a Comment