दहशतवाद हा या देशाचा स्थायीभाव झाला आहे की काय, अशी शंका येऊ लागली आहे.दहशतवादी कारवाया झाल्या नाही,असा दिवस आपल्या देशात उजाडत नाही.अवाढव्य अशा आपल्या देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात दहशतवादाची लहानमोठी घटना घडतच असते. जसा दररोज सूर्य उगवतो, तशी दहशतवादाची घटना घडतच असते.अशी एखादी घटना घडली नाही तरच आश्चर्य वाटण्यासारखी स्थिती आहे. हल्ल्याची घटना घडली नाही, तर किमान दहशतवाद्यांच्या धमकीचे दूरध्वनी तरी येत असतात. असे दूरध्वनी या अफवा आहेत,हे माहिती असतानाही पोलिसांना या निनावी दूरध्वनींची गंभीर दखल घ्यावी लागते. आपली संपूर्ण यंत्रणा त्याच्या तपासात लावावी लागते.पोलिस यंत्रणेची होणारी धावपळ आणि तारांबळ पाहून असे दूरध्वनी करणार्यांना आनंद होत असतो. त्यांचा उद्देशच तेवढा असतो. दहशतवादाच्या धमकीचे बहुतांश दूरध्वनी हे खोडसाळ स्वरूपाचे असतात.पोलिसांना त्रास देण्याच्या उद्देशाने ते केलेले असतात.हे माहीत असतानासुद्धा पोलिस त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाहीत. कारण एखाद वेळी असा दूरध्वनी खरा निघाला तर पोलिस अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे कोणताही धोका पत्करायची पोलिस खात्याची तयारी नसते ‘लांडगा आला रे आला’सारखी ही स्थिती असली, तरी त्याकडे कोणत्याही स्थितीत डोळेझाक करता येत नाही.
गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीसारखे मोठे सण आल्यावर पोलिसांवरची जबाबदारी आणखी वाढून जाते. कारण गर्दीचे हे सण म्हणजे दहशतवादी कारवाया घडवण्यासाठी दहशतवाद्यांच्या दृष्टीने सुवर्णसंधीच असते. आजकाल सर्व उत्सवांनाच भव्य रूप आले आहे. राजकीय कार्यकर्तेच नाही, तर मोठमोठे नेतेही यात सहभागी होऊ लागले. कोट्यवधी रुपयांची उलाढाल यानिमित्ताने सुरू झाली. अशा उत्सवांचा राजकीय कारणासाठी उपयोग सुरू झाला. यातून निवडणुका जिंकण्यासाठी जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला. गणपती आणि नवरात्रात हजारो नाही, तर लाखोंच्या संख्येत लोक घराबाहेर पडत असतात. या काळात तर रात्री रस्त्यांवर पाय ठेवायलाही जागा नसते. सर्वत्र नुसता माणसांचा महापूर असतो. त्यामुळे कोणतीही दहशतवादी घटना घडवणे अतिशय सोपे असते.अशा वेळी नुसती चेंगराचेंगरी झाली तरी एखाद्या बॉम्बस्फोटात जेवढी प्राणहानी होणार नाही त्यापेक्षा जास्त प्राणहानी होऊ शकते आणि यासाठी बॉम्बस्फोट घडवण्याची गरज नाही.साधी अफवाही पुरेशी असते. तशीच वेळ आता आल्यासारखी दिसते.पंढरीच्या वारीवर दहशतवादाचे सावट आले आहे. पंढरीची वारी ही आमच्या देशाची संस्कृती आहे, ओळख आहे, मराठमोळी अस्मिता आहे. हजारो वर्षांपासून ती जपली जात आहे. सामाजिक समरसतेचे सर्वांत मोठे उदाहरण आहे. या वारीत सहभागी होणार्याला कुणी त्याची जात विचारत नाही. त्याची जात एकच असते- ती म्हणजे वारकरी! त्या वारीवरच दहशतवादाची काळी छाया पडते की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. लाखो लोक पंढरीच्या या वारीत सहभागी होत असतात. पंढरीच्या विठुरायाच्या भेटीसाठी त्यांचा जीव तळमळत असतो.त्यासाठी सात-आठशे कि.मी.चा प्रवास ते ‘ग्यानबा तुकाराम’च्या गजरात पायी करत असतात.गाडीसाठी पैसे नाही म्हणून हे सर्व लोक पायी पंढरपूरला जातात असे नाही, तर पायी वारी करण्याचा एक वेगळाच आनंद असतो. देहूवरून निघणार्या तुकोबारायांच्या व आळंदीवरून निघणार्या ज्ञानेश्वरमाउलींच्या पालखीत हजारो नाही, तर लाखो वारकरी देहभान विसरून सहभागी होत असतात. वारकरी नाही, तर त्यांच्या माध्यमातून संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरमाउली पंढरीच्या विठोबाच्या दर्शनाला जात असतात. वारकरी तर निमित्तमात्र आहे.लाखो वारकर्यांची ही भक्तिगंगा पंढरपूरच्या दिशेने वाहत असते.वारकर्यांचा हा जनसागर विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवण्यासाठी,त्याला डोळे भरून पाहण्यासाठी आसुसला असतो. पायाला काटे बोचत असताना, उघड्या मैदानात आणि आकाशाच्या छताखाली झोपावे लागत असतानाही वारकर्यांना मात्र त्यात काही वाटत नाही. पंचतारांकित व्यवस्थेचा आनंद ते खर्या अर्थाने लुटत असतात. कारण त्यांच्यासाठी पंढरीचा विठोबा हेच सर्वस्व असते. अशा वारीकडे आता दहशतवाद्यांची नजर गेली असल्याचे वृत्त आहे. पंढरीच्या वारीत दहशतवादी बॉम्बस्फोट घडवू शकतात, अशी माहिती पुणे पोलिसांना मिळाली आहे. तसे पत्र त्यांच्या हाती लागले आहे. काही दहशतवादी दारूगोळ्यासह पुण्यात दाखल झाले आहेत.त्यामुळे पोलिसांची झोप उडाली तर त्यात आश्चर्य ते काय?पुणे पोलिसांनी या पत्राची गंभीर दखल घेतली असून,वारीच्या पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पंढरीच्या या वारीत एखादी दुर्दैवी घटना घडली तर काय होईल, याची कल्पनाच करवत नाही.देशात अशांतता निर्माण करणे एवढाच दहशतवाद्यांचा उद्देश असतो. दहशतवाद्यांना जात नसते, धर्म नसतो असे म्हटले जाते. मग धार्मिक आयोजनांवर दहशतवाद्यांची नजर कशी जाते, असा प्रश्न उद्भवतो. जातीय आणि सांप्रदायिक तणाव निर्माण करणे, समाजात फूट पाडणे हे दहशतवाद्यांचे लक्ष्य असते. त्यासाठी कोणत्याही स्तराला जाण्याची त्यांची तयारी असते. पंढरीच्या वारीवर दहशतवाद्यांची वळलेली नजर, हे त्याचेच उदाहरण आहे. आतापर्यंतच्या पंढरीच्या वारीच्या इतिहासात कोणतीही दुर्देवी घटना घडली नाही. लाखो वारकरी वारीत सहभागी होत असतानाही एखाद्याचाही अपघाती मृत्यू झाल्याचा इतिहास नाही. कारण या वारकर्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी विठुरायाने घेतलेली असते. कारण वारकरी त्याच्या दर्शनासाठी आपला जीव धोक्यात घालून आलेले असतात.
मात्र मागील वर्षी अशीच एक दुर्घटना घडली होती. शेगावहून निघालेली पालखी परत येत असताना रस्त्यात एक ट्रक या वारीत घुसला होता आणि त्याखाली चिरडून अनेक वारकर्यांना आपला जीव गमवावा लागला होता. ही नैसर्गिक नाही तर मानवी आपत्ती होती. मात्र, यावर्षी असाच अपघात पुन्हा होणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. कारण दहशतवादी फक्त बॉम्बस्फोटच घडवतात असे नाही, तर कोणत्याही मार्गाने ते प्राणहानी घडवून आणू शकतात, याकडे आम्हाला दुर्लक्ष करता येणार नाही. वारीच्या संपूर्ण मार्गावर कोणकोणत्या पद्धतीने दहशतवादी हल्ला चढवू शकतात आणि त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत, याचा अभ्यास होण्याची गरज आहे.त्यादृष्टीने प्रशासनाने सुरक्षाव्यवस्था केली पाहिजे.पंढरीच्या वारीत फक्त वारकरीच सहभागी होतात असे नाही, तर मुख्यमंत्री, मंत्री दरवर्षी सहभागी होत असतात. अनेक मान्यवरही यात सहभागी होत असतात. आजपर्यंत कोणतीच नैसर्गिक वा मानवी आपत्ती या वारीत अडथळा आणू शकली नाही.पंढरीचा विठोबा हा देशातील कोट्यवधी लोकांचे आराध्यदैवत आहे.विठ्ठलावर त्यांची प्रचंड श्रद्धा आहे.त्यामुळे दहशतवाद्यांनी हल्ल्याची कितीही धमकी दिली,तरी वारकरी घाबरणार नाही, उलट हजारोंच्या संख्येत या वारीत सहभागी होतील. कारण मारणार्यापेक्षा वाचवणारा मोठा असतो.त्यामुळे दहशतवाद्यांनी कितीही धमक्या दिल्या, तरी वारकर्यांच्या हिमतीत आणि निर्धारात कोणताही फरक पडणार नाही.

No comments:
Post a Comment