मनमाड, (तभा वृत्तसेवा) : उन्हाळा सुरू झाल्यापासून २० ते २२ दिवसांआड नळाद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या मनमाडकरांना पालखेड धरणातून पाणी सोडण्यात आल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पाण्याची टंचाई सर्वाधिक भेडसावणारे शहर म्हणून मनमाडची ओळख असून शहरासाठी पाण्याची तीव्र गरज लक्षात घेऊन पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. पालखेडच्या पाण्याने येवला तालुक्यातील पाटोदा येथील पालिकेचा साठवणूक तलाव पूर्ण भरून घेण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. मनमाडचे नगराध्यक्ष राजाभाऊ अहिरे, पाणीपुरवठा सभापती प्रमोद पाचोरकर, नगरसेवक व अधिकारी तेथेच तळ ठोकून होते. शहरासाठी मंजूर झालेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाटोदा साठवणूक तलावाची क्षमता वाढविण्याचे काम प्रगतिपथावर आहे. त्यामुळे पूर्वीपेक्षा या साठवणूक तलावाची क्षमता तीन पटीने वाढली आहे. परिणामी आवर्तनाचे जास्तीतजास्त पाणी उपसा करून साठवणूक तलाव भरून घेण्यासाठी यंत्रणा सक्षम असल्याचे पालिकेतर्फे सांगण्यात आले. आवर्तनाचे हे पाणी पूर्ण क्षमतेने वागदर्डी धरणात घेतले जात आहे. यामुळे मनमाडकरांना बराच दिलासा मिळाला आहे.
मागील दीड महिन्यापासून शहरातील पाणीपुरवठय़ाची समस्या अधिकच तीव्र झाली. २० ते २२ दिवसांआड सध्या पाणीपुरवठा सुरू आहे. त्यामुळे मनमाडकर हैराण झाले असून सध्या काही विहिरी अधिग्रहित करून त्याद्वारे तसेच जवळपास १९ टँकरद्वारे विविध भागात पाणीपुरवठा केला जात आहे. सार्वजनिक कूपनलिका व टँकरवर पाण्यासाठी झुंबड उडते. शिवाय धरणाने तळ गाठल्याने अशुद्ध पाणीपुरवठा होत आहे. मनमाडच्या पाणीटंचाईचा विषय मंत्रिमंडळातही गाजला. मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटल्यानंतर पालक सचिव व जिल्हाधिकाऱ्यांनी मनमाडला धाव घेतली. बुधवारी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीतही पाणी प्रश्नावर अधिकाऱ्यांना धारेवर धरले. मनमाडला २२ दिवसांआड पाणीपुरवठा होतो ही गंभीर बाब असून नगरच्या लोकांनी टँकर सुरू केले. मनमाडसाठी टँकर सुरू करता येत नव्हते का, असे खडे बोलही त्यांनी जिल्हा प्रशासनास सुनावले. मनमाडला सध्या १५ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नांदगावच्या आमदारांनी प्रस्तावित केलेल्या प्रस्तावांची पूर्तता करण्यात येत आहे. मनमाडसाठी पालखेडमधून सोडण्यात आलेल्या पाण्याने पाटोदा व वागदर्डी तलाव भरून घेण्याची खबरदारी घेतली जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पाटोद्यातील गाळ मोठय़ा प्रमाणात काढण्यात आल्याने त्या तलावाची साठवण क्षमता चारपटीने वाढल्याचे मनमाडच्या नगराध्यक्षांनी निदर्शनास आणले. पावसाळा सुरू होण्यास अद्याप पंधरा दिवसांचा कालावधी बाकी असल्याने या पंधरा दिवसांत मनमाडकरांची तहान भागविण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

No comments:
Post a Comment