रायगड,(तभा वृत्तसेवा) : शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाला आज ३३८ वर्ष पूर्ण होत आहेत. जय भवानी...जय शिवाजीच्या जयघोषात स्वराज्याची राजधानी दुमदुमली. रायगडावर आज छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. या वेळी महाराजांच्या उत्सवमूर्तीला सुवर्णमुद्रांनी अभिषेक करण्यात आला.
याच निमित्ताने शिवछत्रपतींचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते महाराज्यांच्या पुतळ्यावर पंचधातूचे छत्र बसिवले जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर छत्रपतींच्या पुतळ्यावर आज छत्र उभारण्यात येणार आहे. हा छत्ररोहण सोहळा दुपारी पार पडेल.
सांगलीतील कारागीर ओंकार ओतारी यांनी हे पंचधातूचे छत्र बनवलं आहे. ३५० किलो वजन असलेल्या या छत्रावर सुंदर नक्षीकाम करण्यात आलं आहे. या पंचधातूच्या छ्त्राला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे.
सरकारची अनास्था पाहून श्री शिवप्रतिष्ठानं छत्ररोहण समारंभ करण्याचा पुढाकार घेतला. हे छत्र बनवण्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत.

No comments:
Post a Comment