बार्शी ः- सध्याच्या कलियुगात देशातील नैतिकता रसातळाला चालली असून आपल्या देशामध्ये नीतीमूल्य मानणारे लोककल्याणकारी सरकार यावे यासाठी बार्शीतील जगप्रसिध्द योगीराज वेदविज्ञान आश्रमात गेल्या पंधरा महिन्यांपासून राजसूय महायज्ञ सुरु आहे़ या यज्ञाच्या कालावधीत सात सोमयागदेखील पार पडले आहेत व तीन सुरु आहेत. या राजसूय महासोमयागाची सांगता हजारोंच्या उपस्थितीत अध्यात्मिक पुरुषांच्या अग्रपूजेने १३ जून रोजी होणार आहे़
आपल्या देशामध्ये आठशे वर्षांपूर्वी अशा प्र्रकारचा राजसूय यज्ञ झाला होता़ या यज्ञासाठी सोळा महिने यजमान म्हणून छत्रीय कुळातील व्यक्ती लागत असल्याने मध्य प्र्रदेशातील देवास जिल्ह्यातील राष्ट्राभिमानी पांडवाचे वंशज असणारे राजे मंगलसिंह तंवर व त्यांची पत्नी रुक्मिीणीदेवी जी शेवटचा हिंदू राजा पृथ्वीराज चौहान यांची वंशज आहे. या दांम्पत्यांची निवड केली आहे़ या काळात या यजमानावर जन्मापासून करण्यात येणारे सर्व प्र्रकारचे संस्कार करण्यात आले़ यामध्ये २६ मार्च रोजी राज्याभिषेकदेखील करण्यात आला़ या अभिषेकासाठी गंगा, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा, कावेरी, तुंगभ्रदा या नद्यांचे पाणी आणण्यात आले होते़ यामध्ये एक सोमयाग झाल्यानंतर राजसूय करण्यास पात्र होतो़ या पंधरा महिन्यांच्या काळात हा राजसुय यज्ञ अखंडपणे सुरु आहे़ या यज्ञाचे वैशिष्ट्य म्हणजे सोमरस तयार करण्यासाठी व राज्यभिषेकासाठी श्रौतसुत्रात सांगितल्याप्रमाणे सरस्वती नदीचे पवित्र जल राजस्थानातील मोहनगड येथून प्र्रयत्नपूर्वक शोधून आणले हाच प्रदीर्घ काळानंतरचा सोमयाग आहे़ तसेच तीन समुद्राचे पाणीदेखील आणलेले आहे़ तसेच रविवार द़ि २० पासून आणखींन तीन सोमयाग सुरु करण्यात आले आहेत़ या राजसूय यज्ञाचे कर्म हे अग्रपूजेने संपत असते़ त्रेता युगात धर्मराजाने केलेल्या राजसुय यज्ञात भगवान श्रीकृष्णाची अग्रपूजा करण्यात आली होती़ यावेळेस द़ि १३ जून रोजी होणार्या अग्रपूजेसाठी अध्यात्मिक दृष्टीने उच्चतेच्या पदावर पोहचलेल्या महापुरुषाची अग्रपूजेसाठी निवड करण्यात येते़ त्यामुळे या अग्रपूजेसाठी शक्तीपातरुपी अंतर्यागाचे प़पू़ नारायणकाका महाराज व अग्निहोत्ररुपी बहिर्यागाचे प़पू. दादाश्री जाधव महाराज यांची निवड करण्यात आली आहे़ या दिवशी त्यंाची पूजा झाल्यानंतर या राजसूय यज्ञाची सांगता होणार आहे़ तसेच त्याच दिवशी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे़
गेल्या पंधरा महिन्यापासून कासारवाडी येथील योगीराज वेद विज्ञान आश्रमात एकावेळी चार सोमयाग सुरु आहेत. त्यासाठी प्र्रत्येकी २८ ते ३० जण पौराहित्य करत असल्याचे आश्रमाचे प्र्रमुख नाना काळे यांनी सांगितले़ या अग्रपूजेस व यज्ञाच्या समाप्ती सोहळ्या परिसरातील विविध संत, महंत, ऋषीमुनी तसेच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक के सुदर्शन, संगणकतज्ञ डॉ़ विजय भाटकर यांच्यासह राज्यातील विविध राजकीय, सामाजिक व अध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत़ तसेच या दिवशी महाप्रसाददेखील देण्यात येणार आहे़
गेल्या कांही वर्षांपासून देशात व जगात अनेक वाईट गोष्टी घडल्या आहेत़ मात्र मागील एक वर्षापासून शुद्धीकरणाची प्रक्रिया सुरु झाली आहे़ आपण २८ वर्षांनंतर विश्वचषक जिंकला, ओसामाबीन लादेन अमेरिकेला सापडला, अग्नी ५ ची यशस्वी चाचणी झाली. तसेच सामान्य असलेल्या आण्णा हजारे यांच्या भ्रष्ट्राचारविरोधी आंदोलनाला मोठे यश मिळाले आहे़ त्यामुळे आता बदलाला सुरुवात होवून भारताच्या उत्थानाची वेळ आली आहे़

No comments:
Post a Comment