पंढरपूर - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी इंदु मिलची जागा देण्यास केंद्र सरकार टाळाटाळ करीत आहे. याविरोधात दि. ११ ते १७ जून दरम्यान राज्यात विविध ठिकाणी रास्ता, रेल रोको आंदोलन करण्यात येणार असून रामदेव बाबा व आण्णा हजारे यांच्या आंदोलनास रिपाईचा पाठींबा असल्याची माहिती माजी खासदार व रिपाईचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांनी दिली.
पंढरपूर येथे ऐश्वर्या हॉटेल येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आठवले बोलत होते. पुढे बोलताना आठवले म्हणाले, केंद्र सरकारने ३१ डिसेंबरला इंदु मिलची जागा भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास देण्यास तयार झाले होते. मात्र गेली ५ महिने झाली केंद्र सरकार साडेबारा एकर जागा देण्यास टाळा टाळ करत आहे. या जागेची किंमत वस्त्रोद्योग मंत्रालयाने ५ हजार ५०० कोटी रूपये केली आहे. हे पैसे केंद्र व राज्य शासनाने देण्याचे मान्य केले आहे. परंतु वस्त्रोद्योग मंत्रालय पंतप्रधान यांच्या आदेशाला पाळत नाही. यासाठी रिपाई रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. ११ जून रोजी मुंबई येथे रास्ता व रेल रोको आंदोलन करण्यात येणार असून १७ जूनपर्यंत राज्यातील विविध भागात आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रपती पदासाठी आता आदिवासी व्यक्तीला संधी द्यावी किंवा पतंप्रधान मनमोहन सिंग यांना राष्ट्रपती करावे अशी मागणी रिपाईवतीने करण्यात येणार आहे. रामदेव बाबा व अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला आपला पाठींबा आहे. स्विस बँकेतील काळा पैसा भारत आणण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्न करावे असेही आठवले यांनी सांगितले. प्रकाश आंबेडकर सिध्दार्थ महाविद्यालयात दादागिरी करीत आहेत. या विरोधात आपण आता आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment