जालना, (प्रतिनिधी) - थेट जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेमध्ये प्रचंड भ्रष्टाचार सुरू अस्ाून, संबंधित गुत्तेदाराचा धनादेश देण्यासाठी स्थानिक आमदारांनी ७ कोटी रूपये घेतल्याचा खळबळजनक आरोप जालना नगर परिषदेचे आरोग्य व स्वच्छता सभापती अब्दुल रशीद यांनी आ.कैलास गोरंट्याल यांच्यावर नांव न घेता केला आहे. तसेच, या पाणीपुरवठा योजनेतील भ्रष्टाचाराची सीआयडीमार्फत चौकशी करण्याची मागणीही अब्दुल रशीद यांनी केली आहे.
शहराला पाणी पुरवठा करणार्या घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम शहरातील घाणेवाडी जलसंरक्षण मंचने हाती घेतला आहे. त्यासाठी न.प.चे आरोग्य सभापती व स्वच्छता सभापती अब्दुल रशीद यांनी वैयक्तिकरित्या एक लाख रूपयांचा निधी रमेशभाई शाह यांच्याकडे आज (दि.१०) सुपूर्द केला. त्यावेळी अब्दुल रशीद हे पत्रकारांशी बोलत होते. जालना शहरात भयानक पाणीप्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, नगर पालिकेतील सत्ताधारी लोकप्रतिनिधी आणि स्थानिक आमदारांनी त्याकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्यात पाणीटंचाईमुळे शहरवासियांचे प्रचंड हाल झाले. शहरातील व्यापार्यांनी एकत्र येऊन पाणीटंचाई निवारण्यासाठी हाती घेतलेला घाणेवाडी जलाशयातील गाळ काढण्याचा उपक्रम खरोखरच वाखाणण्यालायक आहे. त्यामुळेच आपण वैयक्तिकरित्या वाखाणण्यालायक आहे. त्यामुळेच आपण वैयक्तिकरित्या मदत म्हणून घाणेवाडी जलसंरक्षण मंचाला १ लाखांचा निधी देत असल्याचे अब्दुल रशीद यांनी सांगितले. जालना शहरासाठी नव्याने होत असलेल्या थेट जायकवाडी-जालना पाणी पुरवठा योजनेत प्रचंड भ्रष्टाचार बोकाळल्याचा आरोप करून अब्दुल रशीद म्हणाले की, या योजनेचे काम करणार्या गुत्तेदाराचा १६ कोटींचा धनादेश देण्यासाठी नगरसेवकांना २५ हजार रूपयांपास्ाून २ लाख रूपयांपर्यंत वाटप करण्यात आले आहेत. एवढेच नव्हे तर स्थानिक आमदाराने यावेळी ७ कोटी रूपये घेतल्याचाही खळबळजनक आरोप आ.गोरंट्याल यांचे नांव न घेता अब्दुल रशीद यांनी केला आहे. तसेच, या सर्व प्रकरणांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी अ.रशीद यांनी यावेळी केली.
यावेळी नगरसेवक विजय पांगारकर, फेरोजलाला तांबोळी यांच्यासह घाणेवाडी जलसंरक्षण मंचाचे पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:
Post a Comment