ही माणसं ज्येष्ठात करडी उन्हं मायेनं मऊसूत झाली अन् ढगांना पाझर फुटू लागला की टाळ-मृदुंग घेऊन चालू लागतात.विठ्ठलाच्या नावाच्या गजरात त्यांचा पदन्यास असतो. आयुष्यातले अपघात अन् घातपाताच्या पल्याडचे हे जग आहे.गेली अनेक शतके वारकर्यांच्या दिंड्या अन् पालख्यांनी महाराष्ट्रीय जीवन समृद्ध केले आहे.त्याच वारकर्यांच्या जिवावर बेतणारे अपघात घडावेत? तेही अगदी सतत?
वारी वारी जन्म मरणाते वारी... या आरतीच्या ओळीत वारी या शब्दाचा श्लेष साधला आहे. जन्म-मरण टाळण्याच्या कल्पनेनेच भक्तीचा संप्रदाय उभा रहात असतो. जन्म-मरणाचा फेरा चुकविल्यावर त्या पलीकडे काय असते, हे माहिती नाही पण जे काय असते ते अक्षय, अविनाशी असते, अढळ असते... असा काहीसा भाबडा भाव मनात नांदवल्याशिवाय भक्तिमार्गाने जाताच येत नाही का? वारकर्यांचे मात्र तसे नाही. संसाराची पायवाट सोपी करण्यासाठीच वारी असते. कुठल्याही राज्याच्या सीमांचा विचार न करता मर्हाटी मुलखातील माणसं आषाढी आणि कार्तिकीला पंढरीच्या वाटेने निघतात. त्यांना कुणी साद देत नाही. कुठलीच ट्रॅव्हल कंपनी पंढरीचा टूर वगैरे काढत नाही. तरीही ही माणसं ज्येष्ठात करडी उन्हं मायेनं मऊसूत झाली अन् ढगांना पाझर फुटू लागला की टाळ-मृदुंग घेऊन चालू लागतात.विठ्ठलाच्या नावाच्या गजरात त्यांचा पदन्यास असतो. आयुष्यातले अपघात अन् घातपाताच्या पल्याडचे हे जग आहे. गेली अनेक शतके वारकर्यांच्या दिंड्या अन् पालख्यांनी महाराष्ट्रीय जीवन समृद्ध केले आहे. त्याच वारकर्यांच्या जिवावर बेतणारे अपघात घडावेत? तेही अगदी सतत? या वारीच्या काळात आतावर तीन अपघात झालेत.बेळगावजवळच्या घटप्रभा नदीच्या पुलावर कर्नाटक राज्य परिवहन मंडळाची बस चाक फुटल्याने अनियंत्रित झाली आणि अपघातात ८ वारकरी विठ्ठलाच्या पायी स्थिरावले... परवा बारामतीतील वारकर्यांचा ट्रकच नदीत कोसळला. ८ वारकरी गेले.
रस्त्यांवर अपघात होतच राहतात. मोठाच अपघात असला तरच त्यावर चर्चा होते. अपघातांचे प्रमाण कमी होत नाही. त्याची वारंवारिता देखील संपत नाही. याचे कारण आहे, किमान रस्त्यांवरचे अपघात म्हणजे वैयक्तिक बाब मानली जाते. त्याची सामूहिक जबाबदारी मान्यच केली जात नाही. शासन, प्रशासन आणि समाज अशी अपघातांची सामूहिक जबाबदारी असते,असे मानले तर अपघातांचे प्रमाण नक्कीच कमी व्हायचे. वारकर्यांचे अपघात तर अत्यंत गांभीर्यानेच घ्यायला हवेत. मृतांच्या नातेवाईकांना लाख लाख रुपयांची मदत घोषित केली की सुटलो, असा पवित्रा शासनाने घेऊ नये. गेल्या दोन-तीन वर्षांपासून या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या वर्षी शेगावच्या वारकर्यांवर एका बेधुंद ट्रकचालकाने झोपेतच घाला घातला होता.मैदानात गाढ झोपी गेलेल्या वारकर्यांना ट्रकने चिरडल्याने आपल्याच मरणाची खबर त्या वारकर्यांनाही लागली नाही. देवाकडे निघालेल्यांना अशा दुर्दैवी पद्धतीने देवाज्ञा व्हावी, हे सामूहिक पाप आहे. परवाचा पुण्याजवळचा अपघात थोडा वेगळा होता. वारकर्यांना घेऊन जाणारा ट्रकच नदीत कोसळला. एकतर वारकरी वाहनातून प्रवास कसे करत होते? तेही ट्रक हे काही माणसांची वाहतूक करणारे वाहन नाही. काही अंतरापर्यंत कुठलेतरी वाहन वापरून पुढे मग पायी वारीत सामीलही व्हायचे असेल,तरीही ट्रकसारख्या मालवाहतूक करणार्या वाहनातूनच हा जीवघेणा प्रवास का केला? रात्रीच्या वेळी प्रवास करायलाच नको. किमान यात्रा, सहल, वारी अशा सामूहिक प्रवासाला निघालेल्यांनी हे पथ्य पाळायलाच हवे. संतांच्या पालख्या घेऊन त्यांच्याच वाटेने निघालेल्यांनी प्रवासाची ही शुचिता पाळायलाच हवी. समर्थ रामदासांनी सांगूनच ठेवले आहे-
वाट वोळखल्याविना जाऊ नये
फळ वोळखल्याविना खाऊ नये
रातीचा प्रवास करू नये एकाएकी...
तरीही कधी दर्शना मूर्ती गाठण्यासाठी किंवा मग परतीच्या वाटेवर घर जवळ करण्याच्या घाईने रात्रीचा प्रवास केला जातो आणि नेमका घात होतो. शिर्डी, शेगावला निघालेल्या भक्तांच्या वाहनांना बर्याचदा अपघात होतात.भक्तांचे जीव जातात अन् मग आपल्या आराध्याच्या, संकटमोचकाच्या दर्शनासाठी निघालेल्यांच्या रक्षणासाठी देव का धावला नाही, असा प्रश्न विचारण्याची संधी बुद्धिवाद्यांना मिळते. चूक कुणाची? मार्ग भक्तीचा असला तरी त्यावरही एक विवेकी थांबा असतो. कुठे थांबायचे, हे शहाणपण भक्तांनाच यावे लागते. विकत घेतानाच नारळ नीट पाहून घ्यायचं नाही अन् वाढवल्यावर ते सडकं निघालं की ‘देवाला पावलं’ असं म्हणत सगळ्याच जबाबदार्या झटकायच्या, असलाच हा प्रकार आहे.
परंपरांची निर्मिती सैद्धांतिक आणि शास्त्रीय आधारावरच होत असते. मात्र, हे आधार वर्तमानकालीन असतात. बदलत्या वर्तमानासोबत परंपरा देखील बदलायला हव्यात. परंपरा पाळताना ‘का?’ हा प्रश्न विचारणे म्हणजे पाप नव्हे. उद्दामपणाही नव्हे. काय जायचे वारीला अन् याच दिवसात का, असे विचारले की त्याची उत्तरे शोधण्याची जबाबदारीही ज्याला प्रश्न पडला त्याचीच असते.उत्तरे शोधण्यासाठी जी धडपड करावी लागते तिलाच साधना असे म्हणत असतात. साधकाला प्रश्न पडलेच पाहिजेत. त्यातूनच त्याला शहाणपण येत असतं. वैशाखाच्या झळा सोसत जमिनीची मशागत केल्यावर पाण्याच्या चाहुलीनं कावराबावरा झालेल्या ज्येष्ठात खेड्यातली माणसं,बुहदा कृषिवलच पंढरीची वाट धरत असतात. पुढे पाऊस येणार असतो. धारा बरसणार असतात अन् मग पेरणीची लगबगही असते. अशा दिवसात धनी पंढरीच्या वाटेने निघाला असतो... का? ऐन वैशाखात जमिनीची जांभुळवाही करताना रापलेला म्हणजेच आयुष्याच्या झळांनी उसासलेला तो पंढरीच्या वाटेने निघालेला असतो. विठुनामाच्या गजरात, नामस्मरणाच्या धारात तो चिंब भिजतो. शांतावतो. जिंदगीच्या जमिनीची मशागत झाली असते अन् मग त्यावर भक्तिभावनेचे बीज पेरले जाते पंढरीच्या वाटेवर. त्यातूनच भक्तिपंथाचा मळा फुलतो. भक्तीचा हा व्यवहार नरहरी सोनाराचा असतो. शेत तसेच टाकून पंढरीच्या वाटेने निघालेला एखादा विठुवेडा आपल्याला मूर्ख वाटतो. लौकिक अर्थाने ते शहाणपण नाही, पण त्यांचा व्यवहारच वेगळा असतो. आता पेरणीच्या दिवसात पंढरीला गेलेले हे वारकरी (शेतकरी हा शब्द किती जवळचा वाटतो ना वारकरीच्या?) नंतर कार्तिकात कापणीच्या दिवसातच परत पंढरीला जातात, हे देखील सूचक नाही का? भक्तिपंथाचा मळा फुललेला असतो. आषाढात एकादशीला हरिनामाची पेरणी केल्यावर त्या पिकाची काळजी मात्र विठुमाउलीला असते. भक्तांंना जागं करून देव मात्र निजतात. भक्त जागा असावा लागतो. देव निजला तरी चालतो. चार महिने भक्तीचं हे पीक वाढत जातं. फुलारतं. फलधारणा होते. भक्तिभावाची सुगीच निर्माण होते अन् मग कापणीला कार्तिकीची वारी येते...
आता मात्र या वारीचे हे शेती- मातीशी असलेले संदर्भ बदलले आहेत. वारी तीच आहे. तशीच आहे पण तिला लौकिक व्यवहाराचा चटका बसला आहे. वारी पॅशन होती, आता ती फॅशनही झाली आहे. वारीला कुणीच आयोजक नव्हते, आता आयोजकांसोबत प्रायोजकही आलेत. महाराष्ट्रीय जीवनात ती एक मोठी आणि महत्त्वाची सांस्कृतिक घटना होती. आता तो इव्हेंटही होतो आहे.व्यापारी वारीचा वापर एमआरपीसाठी आणि दूरचित्रवाहिन्या तो टीआरपीसाठी करू लागल्या आहेत आधी दर्दींसाठी वारी होती, आता तिची ओळख गर्दी झाली आहे. वारीवर दहशतवादाचे सावटही आले आहे. काहीही न पाहता केवळ हाती तुळशीमाळ अन् कपाळी बुक्का आहे हे दिसताच एकमेका लोटांगण घालणारे वारकरी देखील आता जातिवंत होत आहेत.ज्या संतांच्या पालख्या खांद्यावर वाहायच्या त्यांचेच विचार विसरून जात्याभिमान बाळगायचा,हा वारकर्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा अपघात नाही का?तुका ‘आमचाच’ असल्याने कळस तोच झाला याद वाद नाही, पण पाया कुणी रचला, ज्ञानेदवांनी की नामदेवांनी याचाही वाद केला जातो. तो केवळ जातीय भावनेतून असतो.महाराष्ट्राला भाबड्या ऐक्याच्या सूत्रात बांधणारी एक मोठी सामाजिक, सांस्कृतिक, बुद्धिवादी चळवळ अशा वाटेने निघाली आहे, हा देखील अपघातच नाही का जीवघेणा? मराठी मुलखात रांगता लेक बोलू लागला की त्याच्या समोर टाळ्या वाजवून ‘म्हण विठ्ठल विठ्ठलऽऽ’ असे त्याला शिकविणारे आम्ही आता ‘जॉनी जॉनी, यस पप्पा’ म्हणायला शिकवतो आहोत... संस्कृती, संस्कार, समाज, शिक्षण या सगळ्याच पातळ्यांवर चिरडून मारणारा हा अपघातच नाही का? लाख लाख अनुदान देऊन हे नुकसान भरून निघणार आहे का? थांबवू शकणार आहोत का आपण वारकर्यांचे हे अपघात की विठ्ठलाच्या पायी वीट थरारतच राहणार?

No comments:
Post a Comment