सोलापूर, दि. १ जून (हिं.स.) - केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात केलेली प्रतिलिटर सात रुपये ५० पैसे या अभूतपूर्व दरवाढीच्या निषेधार्थ भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीने पुकारलेल्या भारत बंदला सोलापुरातील व्यापार्यांनी कडकडीत बंद पाळून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. काही भागात किरकोळ दगडफेकीचे प्रकार वगळता बंद शांततेत पार पडला. शहरातील प्रमुख व्यापारी पेठा दिवसभर बंद राहिल्यामुळे कोट्यवधींचा व्यवहार ठप्प झाला होता.
केंद्र सरकारने पेट्रोलच्या दरात भरमसाठ वाढ केल्यामुळे आर्थिक अराजक माजेल. या दरवाढीमुळे भाववाढीचे दुष्टचक्र अधिक गतिमान होईल म्हणून या भाववाढीचा निषेध करण्यासाठी भाजपासह राष्ट्रीय लोकशाही आघाडीने गुरुवार, ३१ मे रोजी भारत बंदचे आवाहन केले होते. या आवाहनास सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोलापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बंद पाळण्यात आला. सैफुल परिसरात शिवसेनेचे माजी आ.शिवशरण पाटील-बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून व्यापार्यांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माकपाच्या वतीने माजी आ.आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी येथील ३०० महिला कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. दरम्यान दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे ३ कर्नाटक राज्याच्या एस.टी. गाड्यांवर तसेच २ राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर दगडफेकीचे किरकोळ प्रकार वगळता भारत बंद शांततेत पार पडला.
हिन्दुस्थान समाचार / ०१.०६.२०१२ / अमर पुराणिक / चैताली गुरव / मिनल माळी

No comments:
Post a Comment