स्पर्धा परीक्षा....
कर्मचारी निवड आयोगातर्फे केंद्र सरकारच्या विविध विभाग आणि कार्यालयांमध्ये उमेदवारांची निवड करण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
उपलब्ध संधी आणि जागांचा तपशील :- या निवड स्पर्धेच्या केंद्र सरकारच्या कार्यालयांमध्ये डेटा एंट्री ऑपरेटर व कनिष्ठ लिपीक स्तरावरील उमेदवारांची निवड करण्यात येणार असून, उपलब्ध जागांची संख्या व तपशील नंतर जाहीर करण्यात येईल.
शैक्षणिक पात्रता :- अर्जदारांनी १०+२ शैक्षणिक अभ्यासक्रमांतर्गत बारावीची परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी व त्यांना संगणकाचे ज्ञान असायला हवे
वयोमर्यादा :- २६ वर्षे. राखीव गटांसाठी शिथिलक्षम.
निवड प्रक्रिया :- अर्जदारांपैकी पात्रताधारक उमेदवारांना लेखी निवड परीक्षेसाठी बोलाविण्यात येईल. ही निवड परीक्षा निर्धारित परीक्षा केंद्रावर २१ व २८ ऑक्टोबर २०१२ रोजी घेण्यात येईल. त्या मध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, नागपूर, पुणे, नाशिक व अमरावती या परीक्षा केंद्रांचा समावेश करण्यात येईल.
लेखी निवड परीक्षेत निर्धारित गुणांक मिळविण्याचा उमेदवारांना कौशल्य चाचणी व मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊन त्याआधारे त्यांची अंतिम निवड करण्यात येईल.
अर्जासह भरावयाचे शुल्क :- अर्जासह भरावयाचे शुल्क १०० रुपये असून, विहित नमुन्यात अर्ज करणार्या उमेदवारांनी ते निर्धारित टपालघरांमध्ये उपलब्ध असणार्या सेंट्रल रिक्रुटमेंट स्टँप स्वरूपात तर संगणकीय पद्धतीने अर्ज करणार्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कुठल्याही शाखेत रोखीने भरणे आवश्यक आहे.
अधिक माहिती व तपशील :- अर्जाचा नमुना, अधिक माहिती व तपशिलासाठी ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’च्या १४ ते २० जुलै २०१२ च्या अंकात प्रकाशित झालेली कर्मचारी निवड आयोगाची जाहिरात पहावी अथवा आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
अर्ज करण्याची पद्धत व शेवटची तारीख :- संगणकीय पद्धतीने वरील संकेतस्थळावर तर महाराष्ट्रातील उमेदवारांनी विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेेले व आवश्यक ते कागदपत्र आणि रिक्रुटमेंट तिकिटांसह असणारे आपले अर्ज क्षेत्रिय निदेशक (पश्चिम क्षेत्र), कर्मचारी निवड आयोग, पहिला मजला, प्रतिष्ठा भवन, १०१, महर्षी कर्वे मार्ग, मुंबई ४०००२० या पत्त्यावर पाठवावित. शेवटची तारीख १० ऑगस्ट २०१२.
बारावी उत्तीर्ण व संगणकाचे ज्ञान असणार्या ज्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारच्या सेवेत आपले करीअर सुरू करायचे असेल अशांनी या स्पर्धा परीक्षा संधीचा लाभ घ्यावा.
द. वा. आंबुलकर

No comments:
Post a Comment