‘लंदन पेरिस न्यूयॉर्क’ची कथा आहे ललिता आणि निखिल यांची. ललिता एक मध्यमवर्गीय दक्षिण भारतीय मुलगी आहे आणि ती मुंबईतील चेंबूरमध्ये रहात असते. तिला शिष्यवृत्ती मिळते. त्यामुळे ती पुढील शिक्षणासाठी न्यूयॉर्कला जाण्याची तयारी करू लागते. ललिता प्रत्येक गोष्ट गंभीरतेने घेत असते. त्यामुळे बुद्धी व मन यांच्यातील वैचारिक संघर्षात नेहमीच हैराण होत असते.
दुसरीकडे बांद्रा येथे राहणारा निखिल श्रीमंत पंजाबी कुटुंबातील मुलगा आहे. लाडाकोडात वाढलेला निखिल बापाच्या पैशाच्या जोरावर चित्रपट निर्मितीचा अभ्यास करण्यासाठी न्यूयॉर्कला जाणार आहे. रोमँटिक वृत्तीच्या निखिलला कोणतेच बंधन आवडत नाही. जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाने जगावे, असे त्याचे मत आहे. कोणतीही जबाबदारी त्याला नकोय.
प्रवासादरम्यान विमानात या दोघांची भेट घेते. ते लंडनमध्ये एक संध्याकाळ एकत्र घालवण्याचा निर्णय घेतात. यादरम्यान त्यांचे वैयक्तिक आयुष्य व प्रेमकथा पुढे येते. पुढच्या आठ वर्षांच्या दरम्यान, ते वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर लंडन, पॅरिस व न्यूयॉर्क येथे एक संध्याकाळ घालवतात. या तीन भागात त्यांची विचारसरणी, मानसिक स्थिती यात आलेले बदल प्रेक्षकांना पाहावयास मिळतात.
या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत अनू मेनन. जे गेल्या दहा वर्षांपासून लंडनमध्ये स्थायिक आहेत. तेथेच त्यांनी दिग्दर्शनाचे प्रशिक्षण घेतले तसेच अनेक लघु चित्रपट बनवले. नंतर ते भारतात आले. हैदराबाद येथे त्यांनी ‘रवी गोज टू स्कूल’ नावाचा छोटा चित्रपट केला. हा चित्रपट एडिनबर्ग चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. नंतर त्यांनी सृष्टी बहल यांच्यासमवेत या चित्रपटाची निर्मिती केली. समांतर सिनेमा, ज्याला व्यावसायिक स्पर्श देणे अनू मेनन यांना आवडते.
या चित्रपटात अली जफर, अदिति राव हैदरी मुख्य भूमिकेत आहेत.
तरुण भारत, सदाफुली. ७ मार्च २०१२

No comments:
Post a Comment