Saturday, March 10, 2012

राहुल द्रविड क्रिकेटमधून निवृत्त

   बंगळूर, (९ मार्च ) - माझी क्रिकटमधील कारकीर्द खूप आनंदात गेली असून मझ्याकडे कीरकीर्दीतील छान छान आठवणी आहेत. निवृत्तीनंतरही मला संघातील मित्रांची व मैदानाची आठवण येईल, असे उदगार भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविडने काढले.
    आज झालेल्या पत्रकार परिषदेत `द वॉल' या नावाने प्रसिद्ध असलेला भारतीय क्रिकेटपटू राहुल द्रविड याने आपली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्ती जाहीर केली. पत्रकार परिषदेला बीसीसीआयचे अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासह माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळेही उपस्थित होते. आपल्या क्रिकेट कारकीर्दीबद्दल बोलताना द्रविड म्हणाला, मला माहीत आहे, की मी काय गमावणार आहे. माझ्या आईवडिलांच्या प्रोत्साहनामुळेच मी इथपर्यंत पोहचलो. माझ्या पत्नीचाही यात मोलाचा वाटा आहे. आजपर्यंतच्या कारकीर्दीत मी समाधानी आहे. कारकीर्दीत
     अनेक चढउतार आले परंतु मी हार मानली नाही. मी प्रयत्नांत कधीही कमी पडलो नाही. आता नवीन खेळाडूंना संधी देऊन माझे इथेच थांबणे योग्य आहे. हा निर्णय घेणे फार कठीण होते, असेही तो म्हणाला. राहुलने ३४४ एकदिवसीय सामन्यात दहा हजार ८८९ धावा केल्या असून, १६४ कसोटी सामन्यात तेरा हजार २८८ धावा केल्या आहेत. त्याने गेल्या १६ वर्षात संघातील मित्रांकडून मिळालेल्या सहकार्याबद्दल आभार मानले व क्रिकेट रसिकांनी त्याच्यावर ठेवलेल्या विश्‍वासाचे कौतुक केले.
    संघातील कर्णधार, निवड समिती, प्रशिक्षक व फिजिओंचे त्याने विशेष आभार मानले.

No comments:

Post a Comment