Friday, March 16, 2012

सचिनचा 'शतकोत्सव' साकारला!

मीरपूर, (हिं. स.) - १२ मार्च २०११ स्थळ ः विदर्भ क्रिकेट असोसिअशन स्टेडीअम, नागपूर साखळी सामना भारत वि. साऊथ आफिका तेव्हा सचिनने १११ धावांची इनिंग केली होती. हे सचिनचे ९९ वे शतक होते. त्यानंतर ३७० दिवस सारे क्रीडाविश्‍व त्याच्या महाशतकाची वाट पाहत होते. वार ः शुक्रवाार, १६ मार्च २०१२ स्थळ ः शेर-ए-बांगला स्टेडीअम, मीरपूर, बांगलादेश विरुद्ध सचिनने आपल्या शतकांच्या शतकाचा दुष्काळ संपविला. त्याचे हे एकदिवसीय कारर्कीदीतले ४९ शतक होते.
ह्या शतकाची आपण गेले वर्षभर वाट पाहत होते ते साकार झाले. तो गोलंदाज अब्दुल रझाक  ज्याच्या गोलंदाजीवर सचिनले शतकीय धाव काढली त्यानेही आपण आज कामी आलो असे मनातल्या मनात का होईना पण कबुल केले असेल. शेर-ए-बांगला स्टेडीअम जे अजूनपर्यंत फक्त बांगलादेशचे मुख्य मैदान म्हणून ओळखले जाणर्‍या मैदानाला सचिनच्या १०० व्या शतकानंतर जागतिक दर्जा येईल हे विशेष. जे या सामन्याचे थेट प्रक्षेपण पहात होते त्यांना असे वाटले असेल ‘आजी म्या ब्रम्ह पाहिले’ ही सर्व उदाहरणे आज सचिनला तोकडीच वाटणार आहेत.
गेले एकवर्ष सर्व भारतीयांना हिच चिंता वाटत होती सचिनच्या शतकांचे शतक कधी होणार. त्यामध्ये वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अशा खडतर टूरही झाल्या पण या काळात सचिनची बॅट म्यान झाली होती. त्याच्या १०० शतकांचा वनवास काही संपत नव्हता. तेव्हा आशिया खंडातील आशिया चषक सुरु झाला. पहिला सामना जिंकला व दुसरा होेता बांगलादेश बरोबरचा. सामना सुरु झाला नियमीतप्रमाणे कर्णधार धोनीने टॉस गमावला आणि बांगलादेशने भारताला फलंदाजीला पाचारण केलं. सलामीवीर सचिन आणि गौतम यंानी डावाला प्रारंभ केेला. गेली २२ वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तप करणारा या खेळाचा निसिम्म भक्त खेळत होता. त्याने सुरवातीला सावध खेळ केला. पण जेव्हा बॉल बॅटवर येत होता तेव्हा त्याने गोलंदाजाचा चांगलाच समाचार घेतला. त्याने शतक पूर्ण व्हावे यासाठी सावध खेळ करत १३७ बॉलमध्ये १०० पूर्ण केल्या. सर्व क्रिकेटजगताने सुटकेचा निःश्‍वास टाकला. त्याने बांगलादेशविरुद्ध ११४ धावंची खेळी केली त्यात त्याने १२ चौकार १ षटकार ठोकला. हे शतक त्याचे या वर्षातील पहिले शतक आहे. बांगलादेशविरुद्धचे हे पहिले शतक आहे व आशिया चषकातील त्याचे दुसरे शतक आहे.
 असाही योगायोग
    अर्थसंकल्प आणि सचिनच्या विक्रमाचे एक छुपे नाते आहे, असेच म्हणावे लागेल. दोन वर्षांपूर्वी सचिनने एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील आपले पहिले द्विशतक झळकविले होते. त्या दिवशी रेल्वे अर्थसंकल्प सादर झाला होता, तर आज शुक्रवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या दिवशी त्याने महाशतक पूर्ण केले.

No comments:

Post a Comment