Wednesday, March 14, 2012

संसदेत शरद पवारांना भोवळ

       नवी दिल्ली - लोकसभेत एका पुरवणी प्रश्‍नाला उत्तर दिल्यानंतर कृषिमंत्री शरद पवार भोवळ येऊन खाली पडले. त्यांना लगेच रुग्णालयात भरती करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.आज प्रश्‍नोत्तराच्या काळात कृषी खात्याची संबंधित पुरवणी प्रश्‍नाला पवार यांनी उत्तर दिले. यानंतर लगेच त्यांच्या रक्तातील शर्करेचे प्रमाण कमी झाले. यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. काही क्षणातच भोवळ येऊन ते खाली पडले.

    पवार यांना लगेच बारामतीच्या खासदार असलेली त्यांची कन्या सुप्रिया सुळे आणि केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी शासकीय कारमधून नजीकच्या इस्पितळात नेले. संसद भवन परिसरात रुग्णवाहिकाही होती. पण, पवार यांनी शासकीय कारनेच जाणे पसंत केले.

    पवार यांना सकाळपासूनच अस्वस्थपणा जाणवत होता. तशी तक्रारही त्यांनी केली होती, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री व्ही. नारायण सामी यांनी दिली. पवार यांची प्रकृती आता स्थिर असून, काळजी करण्यासारखे काहीच कारण नाही. इस्पिततळातून त्यांना लवकरच त्यांच्या निवासस्थानी नेण्यात येईल, असे पटेल यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment